Corona virus news: Akola@2679: 13 नवे पॉझिटिव्ह;1 मयत

Akola@2679: 13 नवे पॉझिटिव्ह;1 मयत

अकोला,दि.2:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 245 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 232 अहवाल निगेटीव्ह तर  13 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2679(2313+366) झाली आहे. आज दिवसभरात 32 रुग्ण बरे झाले. आता 423 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.




शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 20356 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 19779, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  410  नमुने होते. आजपर्यंत एकूण 20223  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 17910   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2679(2313+366) आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



आज 13 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात  एक पुरुष असून ते सिंधी कॅम्प शास्त्री नगरअकोला येथील  रहिवासी आहेत.  तसेच आज सायंकाळी 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सहा महिला व सहा पुरुष आहेत. त्यात खांबोरा येथील चार जण, कापसी येथील तीन जण तर जीएमसी हॉस्टेल, सिंधी कॅम्प, बोंदरखेड, पीकेव्ही व जूना शहर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



32 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 12 जणांनाकोविड केअर सेंटर अकोला येथून 12 जणांना, ओझोन हॉस्पीटल येथून पाच जणांना तर आयकॉन हॉस्पीटल येथून तीन जणांना अशा एकूण 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे. 


एक मयत
दरम्यान एकाचा मृत्यू झाला. ते ८१ वर्षीय पुरुष असून ते बाळापूर रोड, अकोला येथील रहिवासी होते. त्यांना दि. २२ जुलै रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.


423 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2679(2313+366) आहे. त्यातील  जण 110 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2146 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 423 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 15 चाचण्या, कोणीही पॉझिटिव्ह नाही


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.यात आज दिवसभरात झालेल्या 15 चाचण्यामध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- 
अकोला ग्रामिण अकोट, पातूरबाळापूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाहीतबार्शीटाकळी येथे  तीन चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  तसेच अकोला मनपामध्ये  चाचण्या झाल्या नाही, अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 12 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज चाचण्या झाल्या नाहीत, असे एकूण 15 चाचण्या होऊन त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात 7805 चाचण्या झाल्या असून 372 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


टिप्पण्या