आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3555
अकोला,दि.25: आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 160 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 149 अहवाल निगेटीव्ह तर 11 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3555(2946+609) झाली आहे. आज दिवसभरात 32 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 26110 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 25427, फेरतपासणीचे 174 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 509 नमुने होते. आजपर्यंत एकूण 25948 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 23002 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3555(2946+609) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 11 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व पाच पुरुष आहेत. त्यातील आदर्श कॉलनी व रायखेड ता. तेल्हारा येथील प्रत्येकी तीन जण, तर उर्वरित रतनलाल प्लॉट, आडगाव ता. तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष आहे. ते दोन जण गौरक्षण रोड, अकोला येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 24 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.
32 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 10 जणांना, कोविड केअर सेंटर येथून 12 जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रेजेन्सी येथून दोन जण, हॉटेल रणजित येथून एक जण तर कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून पाच जण, अशा एकूण 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
357 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3555
(2946
+609
) आहे. त्यातील 144
जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 3054
संख्या आहे. तर सद्यस्थितीत 357
पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 202 चाचण्या झाल्या त्यात 33 जणांचाअहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाही. अकोला ग्रामीण येथे 15 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अकोट येथे 23 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे एक चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. बार्शीटाकळी येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 15 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच अकोला मनपा येथे 88 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे 23 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी 26 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशा प्रकारे दिवसभरात 202 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात 33 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 11769 चाचण्या झाल्या असून 647 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा