corona virus news:अकोल्यात कोरोनाची झपाट्याने वाढ; आतापर्यंत 3053 कोरोनाग्रस्त

अकोल्यात कोरोनाची झपाट्याने वाढ; आतापर्यंत 3053 कोरोनाग्रस्त 


आज 433 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 10 डिस्चार्ज


अकोला,दि.10:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 433 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 400 अहवाल निगेटीव्ह तर  33 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3053(2577+476) झाली आहे. आज दिवसभरात 10 रुग्ण बरे झाले. तर एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता 512 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 22186 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 21584, फेरतपासणीचे 169 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  433  नमुने होते. आजपर्यंत एकूण 22059 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 19482  आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3053(2577+476) आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



आज 33 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व 26 पुरुष आहेत. त्यातील पुनोती बार्शीटाकळी येथील सहा जण,रिधोरा येथील चार जणअकोटजठारपेठहिवरखेड येथील प्रत्येकी तीन जणबार्शीटाकळी येथील दोन जण तर उर्वरित शिवणीगौरक्षण रोडगिता नगरकेळकर हॉस्पीटलसुधीर कॉलनीमोठी उमरीमानापातूरसिव्हील लाईनपिंपरी ता अकोटदहिगाव गावंडे ता.अकोला व वाल्पी ता.बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.



10 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, ओझोन हॉस्पीटल व ऑयकॉन हॉस्पीटल येथून प्रत्येकी एक जण, तर हॉटेल रेजेन्सी येथून पाच जणांना अशा एकूण 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.



 

512 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3053(2577+476) आहे. त्यातील  116 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2425 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 512 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.



कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 165 चाचण्यामध्ये  केवळ 14 जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 165 चाचण्या, 14 पॉझिटिव्ह


आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण, बाळापूर, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाही. अकोट तेथे 45 चाचण्या झाल्या त्यात सात पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी तेथे आठ चाचण्या झाल्या त्यात एक पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 60 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तसेच  अकोला मनपा येथे 31 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह  आले, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी 19 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशा प्रकारे दिवसभरात 165 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात 14 अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 9768 चाचण्या झाल्या असून 496 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या