corona virus news:आतापर्यंत 119 कोरोनाग्रस्तांचा अकोल्यात मृत्यू; लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करा

आतापर्यंत 119 कोरोनाग्रस्तांचा अकोल्यात मृत्यू; लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करा




*लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात दाखल करावे 


*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची संयुक्त बैठक


*आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3124(2627+497) आहे. त्यातील  119 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2458 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 547 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.



अकोला,दि.12: कोविड-19 चे लक्षणे दिसून येताच घरी वेळ न घालवता रुग्णाने तात्काळ घसातील स्त्रावाची तपासणीसाठी रुग्णालयात दाखल व्हावे तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायकांनी रुग्णामध्ये कोविडचे लक्षणे आढळताच रुग्णाबाबत महानगरपालिका किवा आरोग्य विभागात सूचना द्यावी. वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे व योग्य पध्दतीने उपचार झाल्यामुळे कोविड रुग्णाची  प्रकृती गंभीर न होता तो बरा होवून  मृत्यू दर कमी होईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी सांगितले.



शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-19 मृत्यू परिक्षणबाबतची शासकीय  महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक सोमवार (दि.10) रोजी संपन्न झाली. या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, डॉ. कुसमाकर घोरपडे, डॉ. श्यामकुमार सिरसाम, डॉ. प्रदीप उमप, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. अनिल बत्रा, डॉ. संजय वाघ व  डॉ. दिलीप सराटे उपस्थिती होती.



दि. 31 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीतील कोविड रुग्णांचा झालेल्या मृत्यूच्या वैद्यकीय कारणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कालावधीत 14 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात 12 पुरुष व दोन महिलाचा समावेश आहे. त्यापैकी पाच रुग्ण उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात झाले होते. 10 रुग्णांना अगोदरच कोविड व्यतिरिक्त इतर आजार जसे मधुमेह, उच्च्‍ा रक्तदाब किंवा मुत्रपिंडाचे आजार असल्याचे निर्दशनास आले तर नऊ रुग्ण हे 60 वर्षावरील होते.


रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी या सर्वाना एचआरसीटी वर फुफ्फुसाचे पाच ते सहा लोब खराब झाल्याचे दिसुन आले. त्याच प्रमाणे शरिरातील मुत्रपिंड व स्वादुपिंड या सारखे अवयव योग्य पद्धतीने कार्य करीत नसल्याचे आढळले. अशा अवस्थेमध्ये रुग्ण औषधोपचारास योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही. यावेळी फुफ्फुस व इतर अवयव बऱ्याच अंशी निकामी झाल्याने रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर झालेली असते.  14 पैकी पाच रुग्ण लक्षणे सुरु झाल्यांनतरही घरी किवा स्थानिक वैद्यकीय व्यवसायिकांकडून उपचार घेत राहीले. यांचा कालावधी हा 5 दिवसापेक्षा जास्त होता. रुग्णालयात दाखल होण्याकरीता झालेल्या विलंबामुळे या रुग्णांमध्ये कोविड-19 हा आजार बळावला होता व महत्चाच्या अवयवांवर याचा गंभीर परिणाम झाला होता आणि शरिरातील महत्वाचे अवयव निकामी होऊन मृत्यू झाला.


कोविड रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी या बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले की, कोविड-19 ची लक्षणे दिसुन येताच घरी वेळ न घालवता रुग्णाने तात्काळ घशातील स्त्रावाची तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल, दोन रुग्णांनी खाजगी दवाखान्यात औषधोपचार घेतला होता नंतर श्वसनक्रिया खालावली असतांना सर्वोपचार रुग्णालयामध्ये धाव घेतली होती तोपर्यंत त्यांचे फुफ्फुस निकामी झाले होते. तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी रुग्णामध्ये कोविड लक्षणे आढळताच  संबंधित रुग्णाबाबत महानगरपालिकेस सूचना द्यावीत, जेणेकरुन रुग्ण गंभीर न होता लगेच शासकीय रुग्णालयात दाखल होईल व पुढील योग्य पद्धतीने उपचार सुरु होतील  मृत्यूदर कमी होईल.


451 अहवाल प्राप्त; 16 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज, 2 मयत 

आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 451 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 435 अहवाल निगेटीव्ह तर  16 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3124(2627+497) झाली आहे. आज दिवसभरात 14 रुग्ण बरे झाले. तर एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता 547 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 22837 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 22226, फेरतपासणीचे 169 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  442  नमुने होते. आजपर्यंत एकूण 22742 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 20115  आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3124(2627+497) आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 16 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व 13 पुरुष आहेत. त्यातील केळकर हॉस्पीटल येथील दोन जण तर उर्वरित गिता नगरकापसीजीएमसीमुर्तिजापूरभिम नगरमोठी उमरीकौलखेडकृषि नगरनिमकर्दाजठारपेठसस्तीकोठारी व वाघाडी वरखेड ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक पुरुष असून  ते निमकर्दाअकोला येथील रहिवासी आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

14 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांनाउपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सात जण तर ऑयकॉन हॉस्पीटल येथून दोन जणांना अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

दोन मयत

दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. त्यात वंजारीपुराबार्शीटाकळी येथील 55 वर्षीय पुरुष असून तो दि. 11 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला तर मुर्तिजापूर येथील 48 वर्षीय महिला असून ती दि. 1 ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

 

547 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3124(2627+497) आहे. त्यातील  119 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2458 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 547 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.



रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 141 चाचण्या, पाच पॉझिटिव्ह

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 141 चाचण्यामध्ये  केवळ पाच जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण,  पातूर, बाळापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाही. अकोट येथे 15 चाचण्या झाल्या त्यात दोन पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात एक जणांचा अहवाल पाझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 21 चाचण्या झाल्या त्यात एक पॉझिटीव्ह आला,  तसेच अकोला मनपा येथे 84 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह  आला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी 17 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज चाचण्या झाल्या नाही.

अशा प्रकारे दिवसभरात 141 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात पाच अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 10118 चाचण्या झाल्या असून 508 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


टिप्पण्या