Dr Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वरील "समतेचे महाकाव्य" जगातील पहिल्या महाकाव्याच्या संग्रहाचा पहिला भाग बाळासाहेब आंबेडकर यांना भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वरील "समतेचे महाकाव्य" जगातील पहिल्या महाकाव्याच्या संग्रहाचा पहिला भाग बाळासाहेब आंबेडकर यांना भेट


अकोला दि. १३: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्या वरील समतावादी कार्याचा गौरव करणारे "समतेचे महाकाव्य" या महाकाव्याच्या संग्रहाचा पहिला भाग ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना आज अधिका-यांनी भेट दिला. 



सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वनाथ शेगावकर, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे, तहसीलदार लोखंडे आणि अबरार खान यांचे सह वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जि प गटनेता ज्ञानेश्वर सुल्ताने, सिद्धार्थ शिरसाट, प्रा प्रसनजीत गवई, डॉ उन्हाळे प्रामुख्याने उपस्थित होते.

एड बाळासाहेब आंबेडकर यांना यशवंत निवास अकोला येथे सकाळी हे महाकाव्य  सोपविण्यात आले.


विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे वरील ५००० कवितांचा संग्रह पाच खंडात प्रकाशित करण्यात येत आहे.प्रशासकीय अधिकारी, कवी, पत्रकार, शिक्षक व नागरिक यांनी एकत्रित हा उपक्रम राबविला आहे.


जगात कुठल्याही महापुरुषांवर एवढ्या मोठ्या संख्येने कवितांचे महाकाव्य ह्या पूर्वी प्रकाशित झाले नाही, हे विशेष. पाच खंड प्रकाशित झाल्या नंतर या समतेच्या महाकाव्याचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यासाठी दावा केला जाणार आहे.असे वंचितचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या