BJP:भाजपाच्या पाठपुराव्याने मूर्तिजापूर येथे पीक विमा समस्या निवारण शिबिर

भाजपाच्या पाठपुराव्याने मूर्तिजापूर येथे पीक विमा समस्या निवारण शिबिर


अकोला: भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर यांच्या पाठपुराव्याने  २० ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील मागील वर्षीच्या प्रधानमंत्री पीक विमा (सोयाबीन) या पिकाची काही तांत्रिक अडचणींमुळे नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी LDM , तालुका कृषी अधिकारी व जिल्हा पीकविमा अधिकारी यांच्या उपस्थितीत समस्यांचे निराकरण करण्यात आले. 


केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे,आमदार रणधीर सावरकर,आमदार हरीश पिंपळे, भूषण कोकाटे,अनिल ठोकळ यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला


मागील वर्षीच्या पीक नुकसानी व यावर्षी कोविड कोरोना व्हायरसच्या संकटांनी हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवाना याचा लाभ व्हावा , या हेतूने जे शेतकरी पीक विमा भरून सुद्धा नुकसान भरपाई च्या लाभा पासून वंचित आहेत त्यांना या शिबिराचा लाभ झाला. या शिबिरात 225 शेतकऱ्यांनी पीक विम्या संदर्भात आपल्या समस्या मांडल्या व बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात आले.  त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर  समाधान जाणवत होते.


यावेळी रितेश बाजकर (शहराध्यक्ष मूर्तिजापूर),  बाबू देशमुख, सचिन  देशमुख, प्रशांत हजारी, कमलाकर गावंडे, कोमल तायडे, राजु इंगोले, दिवाकर काटे, अविनाश साबळे , गोविंद बरडे, पंकज किडे, अशोक तिरकर, संदीप जळमकर, विनोद मानकर, गजानन नाकट,  अविनाश यावले, राजू कांबे, राजेंद्र साबळे, राहुल वानखडे, जबीर खान, नितीन ठोकळ, सुमित सोनोने, धिरज वानखडे, गोलू बुंदेले तसेच शेतकऱ्यांची  उपस्थिती होती.

टिप्पण्या