BJP Akola:वाजपेयी यांच्यामुळे भाजपची ओळख जागतिकस्तरावर -रणधीर सावरकर

वाजपेयी यांच्यामुळे भाजपची ओळख जागतिकस्तरावर -रणधीर सावरकर


अकोला: भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उत्कृष्ट पत्रकार राजनेता प्रकार वक्ते राष्ट्रभक्त व देश स्वतंत्र काळात सहभागी होणारे आदर्श नेते होते भारतीय जनता पक्ष यांची ओळख अटलजी मुळे जागतिक स्तरावर झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

स्थानिक डॉक्टर बाबासाहेब  टोपले भाजप सभागृहात माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष माजी महापौर विजय अग्रवाल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर अर्चनाताई मसने, डॉक्टर विनोद बोर्डे ,संजय जिरापुरे, अक्षय गंगाखेडकर संजय गोडा राजेंद्र गिरी सतीश ढगे, सिद्धार्थ शर्मा ,एडवोकेट देवाशीष काकड, संतोष पांडे ,निलेश नानोरे, अमोल गोगे ,गणेश अंधारे ,संतोष पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी संत सेनाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून सात वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव मान्य करण्यात आला.  20 ऑगस्ट रोजी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनात सामाजिक दुरून सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर महत्व विशद केले.  भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते सिद्धार्थ शर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील अनेक बाबीवर प्रकाश टाकला. महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी जागतिकीकरणाच्या काळात अटलजी यांच्या कार्याची महत्त्व व विदेश मंत्री व पंतप्रधान म्हणून केलेल्या कार्याबद्दल गौरव अंकित करून त्यांच्या त्याग बलिदान तपास यामुळे भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. यावेळी एडवोकेट देवाशीष काकड यांनी अटलजी यांच्या कवितेचे वाचन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.  महापौर अर्चनाताई मसने ,गिरीश जोशी यांची समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाचे संचालन संचालन जिल्हा भाजपा सरचिटणीस माधव मानकर यांनी तर प्रास्ताविक डॉक्टर विनोद बोर्डे तर आभार प्रदर्शन संजय जिरापुरे यांनी केले.  सेनाजी महाराज यांच्या जीवनावर सुद्धा यावेळी प्रकाश टाकण्यात आला. उमेश गुजर, धनंजय धबाले, विनोद मापारी, शाम विंचनकर, विलास शेळके, नंदा पाटील  बापू वानखडे, वैकुंठ ढोरे, हरिभाऊ काळे, रामदास सरोदे, अंबादास उमाळे ,सतीश ढगे, योगेश साहू, वैभव मेहरे, कृष्णा पांडे, भूषण सोळंके, रुपेश लोहकपुरे अनिल नावकार, रमेश करिहार, अनिल मुरूमकर, रुपेश यादव, महेंद्र राजपूत, रवी जैन , सुनीता अग्रवाल, नीलिमा वोरा, साधना येवले, सतीश येवले, संतोष डोंगर, जान्हवी डोंगरे, अमोल गोगे, अमोल गीते, शोभा कायंदे, निलेश निनोरे, संतोष पांडे, जयंत मसने, उमेश गुजर, राहुल देशमुख, संजय गोटफोडे, मनोज साहू, भूषण इंदोरीया, अभिजित बांगर आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या