- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा
अकोला,दि.१३: राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि. 14 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
जिल्हा दौरा कार्यक्रम
शुक्रवार दि. 14 रोजी दुपारी 12 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव,
दुपारी पाऊण वा. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोलाकडे प्रयाण व दुपारी एक वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन व बैठकीत उपस्थिती.
पाच वाजेपर्यंत शासकीय अधिकारी यांचे समवेत खालील विषयावर आढावा बैठक.
१.जिल्हयातील तालुका स्तरावरील कोविड-19 बाबत आढावा बैठक
२.राज्य पातळीवर प्रलंबीत विकास कामाचा जिल्हास्तरीय आढावा
३.महानगरपालिका जागेबाबत आढावा बैठक
४.सामाजिक वनीकरण अंतर्गंत वर्ष 2019-2020 मध्ये जिल्ह्याकरीता प्राप्त निधी व त्यांचा विनियोग/ तक्रारीबाबत आढावा बैठक
५.नाविण्यपूर्ण योजनेमधून महान धरणातील गाळ उपसाबाबत आढावा बैठक. पाणी पुरवठा,धरणस्थिती व पाणीटंचाई.
सायं पाच वा. शासकीय विश्रागृह, अकोलाकडे प्रयाण व सायं. पाच ते सहा वाजेपर्यंत राखीव व सायं. सहा ते सात वाजता विविध पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा व राखीव व मुक्काम.
शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. 55 मि. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण,
सकाळी 9 वा. 05 मि. जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत राष्ट्रीय कार्यक्रमास उपस्थिती,
सकाळी 9 वा.50 मि. मेहरबानो कॉलेज येथे रक्तदान शिबीरास सदिच्छा भेट,
सकाळी 10 वा.10 मि. वाजता अकोला थॅलेसिमीया सोसायटी डे-केअर सेंटर यांनी आयोजीत रक्तदान शिबीरास उपस्थिती,
सकाळी साडेदहा ते साडेअकरा दरम्यान राखीव व नंतर मुंडगाव, ता. अकोटकडे प्रयाण,
दुपारी साडेबारा वा.मुंडगाव येथील जनसुविधेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ग्राम पंचायत नवीन इमारतीचे व स्मशानभूमी तार कंम्पाऊंडच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती.
दुपारी दीड वा. अकोटकडे प्रयाण, दुपारी अडीच वा. सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तहसिल कार्यालय येथे धनादेश वाटप कार्यक्रमास उपस्थिती व सवडीने कुरळपूर्णा, जि. अमरावती कडे प्रयाण करतील.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा