Akola MNC:मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आयुक्त वचनबद्ध!

मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आयुक्त वचनबद्ध!

रिलायन्स कंपनी कडून चोवीस कोटी रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या हितासाठी खर्च करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती.



अकोला, दि.३१:अकोला महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचे आश्वासन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी आज विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.



मनपा कर्मचारी कृती समितीचे वतीने अध्यक्ष पी बी भातकुले यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनेच्या वतीने आज मनपा आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

रिलायन्स कंपनी कडून चोवीस कोटी रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या हितासाठी खर्च करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती हे विशेष! स्थायी समितीचे सभापती सभापती सतीश ढगे यांनी सुद्धा प्रलंबित मागण्याची पूर्तता करणार असल्याचे आवर्जून सांगितले आहे.


यामध्ये सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रजा रोखे, आंशिकरण थकीत रक्कम देण्यात यावी, अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे, पदोन्नती व कालबध्द पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ सुरू करून अमलबजावणी करण्यात यावी तसेच कर, जलप्रदाय व इतर विभागातील बेकायदेशीर रोखण्यात आलेली वेतनवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 



यावेळी महापौर, उपमहापौर यांनाही निवेदन देण्यात आले आहे.यावेळी कृती समितीचे पी बी भातकुले , म्युनिसिपल मजदूर युनियन चे अध्यक्ष विठ्ठलराव देवकते, कार्याध्यक्ष धनंजय मिश्रा, विजय पारतवार, संजय काथले, सफाई मजदूर काँग्रेसचे, अनुप खरारे, विजय सारवान, कास्तराईब संघटनेचे उमेश सटवाले, सुनील पाटील , दिलावर खान, लक्ष्मण गाढवे, भारतीय मजदूर संघाचे प्रकाश घोगलीया, उमेश लखन, भारतीय कामगार सेनेचे दीपक दाणे, कैलाश गाढवे, निलेश सिरसाट, सेवानिवृत्त संघटनेचे जी आर खान, आनंद अवसाळकर, ओम ताडम व सर्व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या