World carrom:के. श्रीनिवास आणि नागा ज्योती विजेते

के. श्रीनिवास आणि नागा ज्योती विजेते
अकोला: अंतिम सामन्यात आपल्या असामान्य खेळाचे प्रदर्शन करून माजी विश्वचषक विजेता के श्रीनिवास याने वर्ल्ड ऑनलाइन कॅरम चॅलेंज इंडिया २०२० स्पर्धा जिंकली तर खेळातील सातत्य कायम ठेवून नागा ज्योतीने महिलांची स्पर्धा जिंकण्याचा चमत्कार केला.
आपल्या पहिल्याच सामन्यात एक अल्टिमेट स्लॅम घेणाऱ्या श्रीनिवासने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले सध्याचा विश्‍वविजेता आणि दोन माजी विश्वविजेत्यां समोर चमकदार कामगिरी केली. एक व्हाईट आणि चार ब्लॅक स्लॅम घेत श्रीनिवासने आपले पॉईंट चार वर आणले. एक व्हाईट आणि चार ब्लॅक स्लॅम घेत श्रीनिवासने आपले पॉईंट फक्त चार वर आणले सर्वाधिक दोन अल्टिमेट स्लॅम घेणाऱ्या श्रीनिवासने पहिल्या फेरीत सात तर दुसऱ्या फेरीत आठ असे पॉईंट घेतले होते. रियाज अकबर अलीने एक व्हाईट स्लॅम घेतली परंतु श्रीनिवासच्या खेळापुढे तो टिकू शकला नाही.
अभ्यास आणि सातत्य असल्यास काय चमत्कार होतो, हे नागा ज्योतीने अंतिम सामन्यात दाखवून दिले. दोन वेळा विश्वविजेती रश्मी कुमारी अर्ध्या सामन्यापर्यंत विजया बाबत निश्चित होती. यावेळी रश्मि चे एकूण पॉईंट १६ तर नागा ज्योतीचे २४ पॉईंट होते. पाचव्या बोर्डात नागाने व्हाईट स्लॅम घेत पॉईंट २१ वर आणली तर रश्मी १९ पॉईंट वर आली नव्या बोर्डात नागा २५ रश्मी २४ अशी आघाडीवर होती. सातव्या बोर्डात रश्मीने ७ तर नागाने फक्त २ गुण गमावले. आठवा बोर्डात रश्मीने ८ गुण तर नागाने ५ गुण गमावले आणि नागाने आपलाच आदर्श असलेल्या रश्मीला पराभूत केले.

विश्वविजेता प्रशांत मोरे आणि विश्वविजेती एस अपूर्वा यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हजारो प्रेक्षकांनी या स्पर्धेचा थरार अनुभवला. असून संपूर्ण स्पर्धेत एकूण १०१ स्लॅम (४ अल्टिमेट २२ व्हाईट व ७५ ब्लॅक) घेतले गेले.

या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेचे पुरस्कार उत्कृष्ट (अमेरिका-कॅनडा) लोईस फर्नांडिस उत्कृष्ट (युरोपीय) चामिल कुरे (नेदरलँड्स) उत्कृष्ट आशियाई रोशीता जोसेफ तर उत्कृष्ट व्हाईट स्लॅम पुरुष संदीप देवरुखकर उत्कृष्ट व्हाईट स्लॅम महिला एस अपूर्वा याप्रमाणे घोषित करण्यात आले,अशी माहिती प्रभजीत सिंह बछेर यांनी दिली.
.........

टिप्पण्या