Women's Doctor's:'आयएमए वुमन्स डॉक्टर विंगनेविविध उपक्रमांनी साजरा केला 'डॉक्टर्स डे

'आयएमए वुमन्स डॉक्टर विंगने
विविध उपक्रमांनी साजरा केला 'डॉक्टर्स डे'!
अकोला: अकोल्यातील 'आयएमए'च्या 'वुमन्स डॉक्टर विंग' या संघटनेने 'डॉक्टर्स डे' विविध उपक्रमांनी साजरा केला. हा दिवस डॉ. बिधनचंद्र रॉय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. ते  स्वातंत्र्य सैनिक , राजकारणी आणि पाहिले डॉक्टर होते.

'वुमन्स डॉक्टर विंग'च्या अध्यक्षा डॉ  मिनाक्षी मोरे आणि सचिव डॉ निर्मला रांदड यांनी डॉक्टर्स डे' निमित्त जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ.आरती कुलवाल यांना रूग्णालयासाठी पंखे भेट दिले. याप्रसंगी डॉ. प्रज्ञा वरठे, डॉ. सुवर्णा भोपाळे, डॉ. झेलम देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

 'डॉक्टर्स डे' चे औचित्य साधून 'वुमन्स डॉक्टर विंग'ने वरिष्ठ महिला डॉक्टर्सना प्रमाणपत्र आणि भेट देऊन त्यांचा सत्कार केला. सत्कारमूर्तींमध्ये डॉ. प्रतिभा देशपांडे, डॉ. आशा निकते, डॉ. आशा देशमुख, डॉ. नंदिनी मापारी, डॉ. वंदना बागडी, डॉ. पद‍्मावती कोरपे, डॉ. कल्पना भागवत, डॉ. सरोज राठी, डॉ. अलका तामणे, डॉ. शारदा सलामपुरिया, डॉ. प्रमिला चांडक, डॉ. ज्योती बक्षी, डॉ. लिना आगाशे, डॉ. वंदना जोशी, डॉ. रेणुका भुसारी, डॉ. जयश्री पिसे, डॉ. पद‍्मा कोठारी, डॉ. साधना लोटे, डॉ. सुनंदा केळकर, डॉ. अनुराधा राठोड, डॉ. रेखा बगडिया, डॉ. आशा मिरगे, डॉ. सीमा तायडे, डॉ. मीनाक्षी मोरे, डॉ. मंजू शहा यांचा समावेश होता.  

 'वुमन्स डॉक्टर विंग' आणि 'आयएमए'ने ''बारीश''च्या थीमवर फिल्मी गिताचे चित्रीकरण स्पर्धाही आयोजित केली होती. यामध्ये डॉक्टरांच्या घरातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये डॉ. मयुरी महाजन, डॉ. उत्पला प्रशांत मुळावकर, डॉ. क्षितिजा मराठे, डॉ. लीना आगाशे, डॉ. पूनम चौधरी,  सौ केतकी देशपांडे, डॉ. रश्मी अजमेरा, डॉ. साधना लोटे डॉ. पद्मावती कोरपे, डॉ.मिनाक्षी मोरे, डॉ. निर्मला रांदड, आय एम ए चे अध्यक्ष डॉ. कमल लढ‍्ढा यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता.
.........

टिप्पण्या