- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Tree Planting:निंबबीज व सीडबॉल रोपणाचा प्रारंभ Start of planting neem seeds and seedballs Join the tree planting campaign - Collector Jitendra Papalkar
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
निंबबीज व सीडबॉल रोपणाचा प्रारंभ
वृक्ष लागवड अभियानात सहभागी व्हा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
भारतवृक्ष क्रांती मिशन तर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. आज सकाळी नायगाव येथे रेल्वे मार्गाच्या दुतर्फा निंब वृक्षाचे बिज रोजण व सिड्बॉल रोपण करुन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार विजय लोखंडे तसेच भारत वृक्ष क्रांती मिशनचे ए. एस. नाथन यांची उपस्थिती होती.
यावेळी अकोला ते अकोट या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा हे बीजारोपण करण्यात येणार असून वटवृक्षाच्य्या बियांचे सीडबॉल ही दुतर्फा टाकून त्यांचे रोपण करण्यात येणार आहे. ए.एस. नाथन यांनी आजपासून अकोला येथून अकोटकडे हे बीजारोपण करीत व सिडबॉल टाकत पदयात्रा सुरु केली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी निंब वृक्षाचे बीजारोपण केले व या अभियानाला शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर निंब वृक्षाच्या बिया म्हणजेच निंबोळीचे रोपण करावे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय संस्थांनी आपापल्या परिसरात हे रोपण करुन वृक्ष लागवडीच्या या अभियानात सहभागी व्हावे. यामुळे उष्ण म्हणून गणल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्याचे तापमान नैसर्गिकरित्या नियंत्रणात आणणे भविष्यात शक्य होईल. तसेच अन्य अनेक फायदे या वृक्ष संवर्धनातून आहेत. त्यामुळे लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.
भारत वृक्ष क्रांती मिशन अंतर्गत सन २०१५ पासून अकोला जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष, एक जन्म एक वृक्ष ही वृक्षारोपणाची मोहिम राबविली. या मोहिमेला ‘अकोला पॅटर्न’ म्हणुन प्रसिद्धी मिळाली आहे. आता वृक्ष रोपणाचा एक भाग म्हणून संपुर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात निंबाच्या झाडाचे बिजांचे रोपण करण्याचा मिशनचा प्रयत्न आहे.
असे राबविण्यात येणार आहे अभियान
या उपक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी निंबाच्या झाडाच्या बिया गोळा करुन आपआपल्या शेताच्या बांधावर ७ ते १० फुट अंतरावर दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. तसेच आपआपल्या घराजवळील परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानाच्या आजुबाजुला, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी व इतर ठिकाणी दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. गावातील नागरिक, विद्यार्थी, युवा संघटना व सामाजिक संघटना यांनी ई-क्लास जमीन, खुली जमीन, वनजमीन, डोंगराळ जमीन, रस्त्याचे आजुबाजुला व इतर पडीक जमीनीमध्ये दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत तसेच शहरातील नगरपालिका यांचेमार्फत बियांचे रोपण करण्यात येईल.
तथापि,हा उपक्रम राबवितांना सर्व नागरिकांनी त्यांना कोरोना संसर्ग होऊ नये, याकरिता सामाजिक अंतर पाळावे तसेच या संदर्भात यापूर्वी व वेळोवेळी निर्गमित केलेले सर्व आदेशांचे पालन करावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.
असे होतील फायदे
*अकोलावासियांना उन्हाळ्यात जास्त तापमानांचा सामना करावा लागतो. जर जिल्ह्यात निंबाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात रोपण झाल्यास त्यामुळे वातावरण थंड होऊन उन्हाळ्यामध्ये तापमान कमी होण्यास मदत होते. *या झाडांची पान माकडे/वानरे खात असल्यामुळे माकडांकडुन शेतीतील पिकांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.
*हे झाड शेताच्या बांधावर लावल्यास त्यांचे पाने शेतात पडुन नैसर्गिक खताची निर्मीती होते.
*निंबाचे झाड हे औषधी वनस्पती आहे. तसेच झाडामुळे ऑक्सीजनची मात्रा वाढते तसेच प्रदुषण कमी करते.
*या झाडांमुळे जमीनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होते. या बीज रोपणामार्फत जी झाडे उगवतील त्यांना पाणी देण्याची आवश्यकता नाही. तसेच हे झाड उन्हाळयात हिरवेगार राहते.
*या झाडांचे लिंबोळी आणि पानांपासून फवारणीकरीता लिंबोळी अर्क बनविता येतो, असे अनेक फायदे या झाडाचे असल्याने या लागवड अभियानाचा साऱ्यांना फायदाच होईल,असे ए.एस. नाथन यांनी सांगितले.
......
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा