SSC Result2020:कोकण विभाग राज्यात सर्वात हुशार; औरंगाबादचा ढांग नंबर;दहावीचा निकाल जाहीर The Konkan division is the smartest in the state; Dhang number of Aurangabad; result of 10th announced

कोकण विभाग राज्यात सर्वात हुशार; औरंगाबादचा ढांग नंबर;दहावीचा निकाल जाहीर 

                               f i l e p h o t o


नीलिमा शिंगणे-जगड

अकोला/पुणे: इयत्ता बारावी प्रमाणेच कोकण विभाग सर्वात जास्त गुणांनी पहिल्या नंबरने उत्तीर्ण झाला. तर औरंगाबाद विभागाने यावेळी देखील सर्वांत ढांग (शेवटचा) नंबर मिळविला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने महाराष्ट्र एसएससीचा निकाल 2020 आज 29 जुलै रोजी सकाळी 11:14 वाजता जाहीर केला.तर दुपारी एक वाजता अधिकृत वेबसाइटवर  विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला.



इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 03 मार्च  ते  23 मार्च या कालावधीत मंडळामार्फत घेण्यात आली.  राज्यात कोव्हीड 19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता  23 मार्च  पासून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. व त्याचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आला.याकालावधीत परिक्षोत्तर कामामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, परीक्षक, नियामक, मुख्य नियामक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व संघटना यांनी कठीण परिस्थितीवर मात करून अखेर मंडळाने 10 वीचा निकाल आज  29 जुलै रोजी जाहीर केला. 




 

असा पहा result

mahresult.nic.in. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करून mahresult.nic.in 2020 एसएससी पाहू शकतात. 


SSC Result 2020

95.30% विद्यार्थी उत्तीर्ण

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण 95.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 


कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे.

पुणे :          ९७.३४%

औरंगाबाद : ९२.००%
नागपूर :       ९३.८४%
नाशिक:        ९३.७३%
मुंबई   :          ९६.७२%
कोल्हापूर:       ९७.६४%
लातूर   :          ९३.९%
अमरावती :       ९५.१४%
कोकण  :          ९८.७७%
नागपूर  :           ९३.८४%



परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - 17 लाख 65 हजार 898


परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी - 17लाख 9 हजार 264 


एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - 15 लाख 1 हजार 105


Students registered - 15,84,264 

Students appeared - 15,75,103 

Students qualified - 15,01,105 


                               f i l e p h o t o


व्हेरिफिकेशन करण्यासाठी काय करायचे

ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी विद्यार्थी-पालकांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येते. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येते.



गुण पडताळणीसाठी  महत्त्वाच्या तारखा 


गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत 30 जुलै  ते 8 ऑगस्ट 2020


छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - 30 जुलै  ते १८ ऑगस्ट 2020


सर्वाना धन्यवाद ! 

गायकवाड यांनी मानले मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार

इयत्ता 10  वीस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांना निकालासाठी हार्दिक शुभेच्छा, शिक्षणमंत्री प्रा.वर्षा  गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंट द्वारा दिल्या.

.......


हे सुद्धा वाचा:दहावीचा आज निकाल






टिप्पण्या