- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्राचार्य भिसे यांनी आईचा वाढदिवस वृक्षारोपण व रक्तदान करून केला साजरा
विद्यार्थ्यांसमोर एक आदर्शवाद
कोरोनाच्या कालखंडात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे यांनी केले रक्तदान
अकोला: कोरोना covid-19 मुळे यावर्षी पंढरपूर वारीची परंपरा खंडित झाली असून, प्रत्येक वारकऱ्यांनी आपल्या परिसरात एकादशीला वृक्षारोपण करावे व त्याचे संगोपन करावे,असा आदेश वारकरी संप्रदायाने काढला. या आदेशाचे पालन करीत आणि आपल्या आईच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे यांनी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले. तसेच हेडगेवार रक्तपेढीत जावून रक्तदान करून,विद्यार्थ्यां समोर नवा आदर्श ठेवला.
डॉ. भिसे यांच्या यांच्या मातोश्री हरीदिनी मार्तंडराव भिसे यांनी श्री शिवाजी पार्क येथे आपल्या ७४ व्या वाढदिवसा प्रित्यर्थ वटवृक्ष, पिंपळ व कडुलिंब या तिन्ही वृक्षांची लागवड केली. तसेच याच परिसरात प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे यांनी १०,००० रुपयाची झाडे लावली आहेत .त्यांच्या संगोपनाची जबाबदारी सुद्धा उपमहापौर राजेंद्र गिरी व युवानेते पवन महल्ले यांनी घेतली आहे.
याप्रसंगी वऱ्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी वृक्षारोपण व सर्वधर्मसमभावाची चळवळ अधिक प्रभावी करण्याचे आवाहन केले. 'आई-वडिलांना विठ्ठल रुक्माई समजून आपल्या घरीच त्यांची पूजा करावी आणि विठ्ठल रुक्माई चे दर्शन घ्यावे असा' प्रासंगिक संदेश उपस्थितांना डॉ.विठ्ठल वाघ यांनी दिला.
वटवृक्षाप्रमाणे निरोगी आयुष्य लाभून परिसरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढीस लागण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उपयुक्त असल्याचे प्रतिपादन उपमहापौर राजेंद्र गिरी यांनी केले.
प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे यांनी सुद्धा आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या कालखंडात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान केले. तरुणांनी सुद्धा वृक्षारोपण व रक्तदान करून आपल्या आई-वडिलांचा वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
याप्रसंगी वऱ्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ व प्रभा वाघ, मार्तंडराव भिसे, उपमहापौर राजेंद्र गिरी , पंकज जायले, पवन महल्ले प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, रमा भिसे, डॉ.आनंदा काळे, डॉ. जीवन पवार, डॉ अविनाश बोर्डे, प्रा.सरप, डॉ.प्राजक्ता पोहरे श्री शिवाजी महाविद्यालयातील एन.एस.एस. चे विद्यार्थी रोहन बुंदेले, सचिन काळे अखिलेश अनासाने ,विशाल मडावी ज्ञानेद्र पर्वते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन डॉ विवेक हिवरे यांनी केले.
.........
टिप्पण्या
युवकांसमोर कृतीतून आदर्श निर्माण करून ,आई वडिलांची सेवा हीच हीच खरी भक्ती आहे हा सामाजिक परिवर्तनाचा मार्ग सरांनी दाखविला आपले मनःपूर्वक अभिनंदन
उत्तर द्याहटवाहार्दिक अभिनंदन
उत्तर द्याहटवा