Online Studies:ऑनलाईन अभ्यास मुलांच्या डोळयांसाठी हानीकारक! Online Studies Harmful to Children's Eyes!

ऑनलाईन अभ्यास मुलांच्या डोळयांसाठी हानीकारक!

नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीराम लाहोळे यांची माहिती


अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी शाळांनी आपल्या विद्याथ्र्यांसाठी सुरू केलेला ऑनलाईन अभ्यासक्रम मुलांच्या नाजूक डोळयांसाठी हानीकारक असून, पालकांनी यासंदर्भात जागरूक राहण्याचा इशारावजा सल्ला राष्ट्रीय पातळीवरील '' NATIONAL ACCREDITATION BOARD FOR HOSPITALS AND HEALTH CARE PROVIDERS '' प्रमाणपत्रास मान्यताप्राप्त झालेल्या लाहोळे नेत्र हॉस्पिटलचे संचालक तथा प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीराम लाहोळे यांनी दिला.

कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे शाळा इतक्यात सुरू होण्याची शक्यता नसल्याने अनेक शाळा आणि कोचिंग क्लासेसनी आपल्या विद्याथ्र्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकांना आपल्या मुलांच्या डोळयां संदर्भात इशारा देणे क्रमप्राप्त असल्याचेही डॉ. लाहोळे म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जागतिक पातळीवर शाळा, महाविद्यालये गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहेत. शाळा सुरू केल्या तरी विद्यार्थी संख्या, शाळांमधील आरोग्यविषयक सुविधा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर या बाबी मुलांसाठी त्रासदायक ठरणार असल्याने आता ई लर्निंगचा अर्थात ऑनलाईन अभ्यास करण्याचा पर्याय समोर आला आहे. परंतु यामुळे मुलांच्या नाजूक डोळयांवरील ताण वाढणार आहे. त्यातून मुलांना कॉम्प्युटर व्हीजन सिंड्रोम ( सीव्हीएस)  हा आजार होवू शकतो. केवळ शाळकरी मुलेच नाही तर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वर्क फ्रॉम होम अंतर्गत ऑनलाईन काम करणारे, वेबिनारमध्ये सहभाग घेणारे आणि व्हीडीओ कॉलिंगचा वापर करणारे अनेक कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनाही हा आजार होवू शकतो, असा इशाराही डॉ. लाहोळे यांनी दिला आहे.


काय आहेत लक्षणे
ऑनलाईन अभ्यासात स्क्रीन टाईम वाढल्यामुळे अनेक लहान मुलांना डोळयाच्या समस्या उदभवल्याच्या तक्रारी लॉकडाऊनच्या काळात नेत्रतज्ज्ञांकडे मोठया प्रमाणावर येवू लागल्या आहेत. डोळे दुखणे, डोके दुखणे, डोळा कोरडा होणे, डोळयांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, अंधूक दिसणे ही या आजाराची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांकडे जावून उपचार करून घ्यावेत, असे आवाहनही डॉ. लाहोळे यांनी केले आहे.

अशी घेता येईल काळजी
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ५ वर्षांखालील मुलांनी डिजीटल उपकरणांवर दररोज एकतास किंवा त्याहीपेक्षा कमी कालावधी घालवावा, ५ वर्षांवरील मुलांनीही याचा सातत्याने वापर टाळावा. अभ्यास करताना संगणक किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरून मुलांनी १५ ते २० मिनीटांनी ३० सेकंदासाठी आपली दृष्टी दुसरीकडे हटवावी, संगणकावर ऍन्टीग्लास स्क्रीन कव्हर लावावे, मजकूर मोठा दिसण्यासाठी ठळक फॉन्टचा वापर करावा, डोळयांना सुखद वाटणारी रंगसंगती ठेवा, असाही सल्ला डॉ. लाहोळे यांनी दिला आहे.    
--------------------------

टिप्पण्या