Modi government: मोदी सरकार हे आरक्षण विरोधी सरकार -प्रकाश आंबेडकर Modi government is anti-reservation government - Prakash Ambedkar

मोदी सरकार हे आरक्षण विरोधी सरकार -प्रकाश आंबेडकर 

*केंद्र सरकार ने आरक्षणचा शासकीय आदेश त्वरित मागे नाही घेतल्यास कोरोनातही आम्ही आंदोलन करू
  
*राज्य सरकार किती वर्ष टिकेल हे ज्योतिष देवेंद्र फडवणीस यांना विचारावं ते सांगू शकतील

*मोदी सरकारच्या चुकिच्या आरक्षणाच्या धोरणामुळे सन २०१७ पासून ओबीसीचे ११००० विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित 

अकोला: केंद्र सरकारने ओबीसीसाठी राखीव असलेल्या वैद्यकीय जागेवर ओबीसी या समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. २०१७ पासून ते आजपर्यंत या
धोरणामुळे ११००० ओबीसीचे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून आरक्षणा अभावी वंचित राहिले आहेत. मोदी सरकारच्या चुकिच्या आरक्षणाच्या धोरणामुळे
सन २०१७ पासून ओबीसीचे ११००० विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित आहेत. मोदी सरकार हे आरक्षण विरोधी सरकार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

ओबीसी विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्याय बाबत सविस्तर  माहिती देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद बोलविली होती,यावेळी ते बोलत होते.

देश पातळीवरील ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेसनी  ही आकडेवारी जाहिर केली असून, नीट या प्रवेशामध्ये ओबीसीला कायद्यानुसार
आवश्यक असलेले २७% आरक्षण न दिल्यामुळे आज ओबीसीचे ११ हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. वस्तुतः भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७% आरक्षण देणे आवश्यक आहे. परंतू
ऑल इंडिया हा नॅशनल इलिजीबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (एन.ई.ई.टी.) मार्फत भरल्या
जात असून केंद्र शासनाने सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसीला आवश्यक असणारे
आरक्षण सन २०१७ पासून कमी केले आहे व त्याचाच फटका ओबीसींना बसला आहे.
परंतू केंद्र सरकारने नीटला हाताशी धरून कट ऑफ मध्ये बदल घडवून ओबीसीचे
आरक्षण संपण्याचा डाव रचला आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र २०१७-१८, २०१९-२० या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ओबीसीला आरक्षणाचा फटका बसला आहे. ओबीसींना हक्काचे असणारे आरक्षण मिळेपर्यंत वंचित बहूजन आघाडी आंदोलन करेल,असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

राज्यातील सरकार पडणार की नाही ,हे भाजपाचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील, मी नाही.असे एका प्रश्नावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी टोला मारला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करतात.त्यांच्या अश्या कार्यशैलीमुळे बारा आमदारांच्या नियुक्ती थांबली आहे. राज्यपाल हे कायदानुसार काम करीत असल्याने राजकीय पक्षांमध्ये पेच निर्माण झाले असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी  एका प्रश्नाचे  उत्तर देताना म्हंटले.
.........



टिप्पण्या