Illegal lending:हुंडी चिट्ठीच्या नावे सुरू असलेल्या अवैध सावकारी प्रकरणात न्याय द्या ! Give justice in the case of illegal lending in the name of hundi letter!

हुंडी चिट्ठीच्या नावे सुरू असलेल्या अवैध सावकारी प्रकरणात न्याय द्या ! 

*सावकार पीडितांची जिल्हा उपनिबंधक कार्यालया वर धडक 

*प्रभारी जिल्हा उपनिबंधक यांना दिले निवेदन 
भारतीय अलंकार
अकोला : सन २०१४ पासून अकोल्यात हुंडी चिट्ठी च्या नावे अवैध सावकारी करणाऱ्या अनेक सावकार विरोधात दिलेल्या शेकडो तक्रारी धूळ खात पडून आहेत , सदर तक्रारींचा निपटारा करीत लवकरात लवकर सावकार पिडीतांना न्याय द्यावा , अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत , सावकार पिडीतांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सोमवारी गदारोळ घातला.  

याबाबत सविस्तर असे की , गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात हुंडीचिठ्ठीच्या नावाखाली बाजार पेठेत अनेकांनी आपली प्रतिष्ठाने उघडली आहे , हुंडीचिठ्ठी च्या नावाखाली अनेक जण अवैध सावकारी करीत असल्याच्या आरोप सुद्धा यावेळी सावकार पीडित आंदोलकांनी केला.  सन २०१४ पासून अकोल्यात हुंडीचिट्ठीची अनेक प्रकरणे घडली आहे , या पैकी काही प्रकरणांमध्ये उपनिबंधक कार्यालय कडून अनेक जणांच्या घरी धाडी सुद्धा टाकण्यात आल्या आहे , त्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी निगडित दस्तावेज, कोरे धनादेश , बॉन्ड अशी अनेक दस्तावेज सुद्धा जप्त करण्यात आली आहे , तर काही प्रकरणांमध्ये मात्र कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी पैशाच्या देवाण घेवाण करून प्रकरणे जागीच निपटविले असल्याचा आरोप सुद्धा यावेळी सावकार पिडीतांकडून करण्यात आला . 

एवढेच नव्हे तर अवैध सावकारी प्रकरणात बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारून अवैध सावकाराला निर्दोष सोडण्याच्या प्रकरणात अधिकारी  दोषी आढळून आल्यावरही त्या अधिकारीवर अद्यापही कारवाही करण्यात आली नाही , त्यामुळे तक्रारदाराना न्याय मिळत नाही , तसेच अवैध सावकारी करणाऱ्या विरुद्ध तत्काळ कायदेशीर कारवाही करावी व न्याय द्यावा, अश्या आशयाचे निवेदन सोमवारी सावकार पिडीतानी प्रभारी जिल्हा उपनिबंधक यांना दिले.
 
अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकणार
सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जमलेल्या सावकार  पीडितांनी अवैध सावकार विरुद्ध एल्गार पुकारला , यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले. सदर निवेदनात नमूद केलेल्या मागण्या व प्रश्नांची उत्तरे १५ दिवसात न दिल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सुद्धा आंदोलकांनी यावेळी दिला. 

या आहेत मागण्या 
*जिल्हा उपनिबंधक लोखंडे यांच्या कार्यकाळातील घडलेल्या सावकारी प्रकरणांची माहिती द्यावी, 
*राजेश राठी व संतोष राठी या दोघांकडेही धाड टाकल्यावर 430 धनादेश व 34 लक्ष रुपयांची मुद्दल सापडल्यावर ही त्यांच्यावर अद्याप कारवाई का नाही याबाबत माहिती द्यावी, 
*हुंडी चिट्ठी व्यवसाय हा कायदेशीर कसा याबाबत शासन निर्णय द्यावा
*प्रवीण लोखंडे यांच्या कार्यकाळातील परवानाधारक सावकारांकडे गहाण ठेवलेले सोने अद्याप परत मिळाले नाही याबाबत झालेल्या कार्यवाहीची तपशीलवार माहिती द्यावी , 
*तसेच तत्कालीन तालुका उपनिबंधक सुरेखा फुफाटे याच्या विरोधात एका अवैध सावकारी प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल , जिल्हा उपनिबंधक यांचा अहवाल असे सर्व सबळ पुरावे असताना सुद्धा त्यांच्या वर कारवाही कधी होणार? 
अश्या विविध मागण्यांचे निवेदन मंगेश खंडारे, अनुप आगरकर,मनीष देशमुख,राजू पाटील,विवेक संगवई, दीपक झाम्बड,दीपक जंजाळ,शरद सारडा, प्रशांत गणगे आदींनी दिले.

टिप्पण्या