HTBT:प्रतिबंधित कपाशीच्या HTBT वाणाची चाचणी व निरीक्षण नोंदणी

प्रतिबंधित कपाशीच्या HTBT वाणाची चाचणी व निरीक्षण नोंदणी 

 अकोला: प्रतिबंधित ht Bt या कपाशीच्या वाणाला मान्यता नाही. परंतु, शेतकरी वर्ग या बियाणाला मान्यता मिळावी याकरिता मागणी करत आहेत. शेतकरी संघटना शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळावे, याची मागणी करीत आहे. सरकार दरबारी याचा पाठपुरावा करून सुद्धा शासन कोणत्याही निर्णयावर पोहचत नाही. मागील वर्षी 36%शेतकऱ्यांनी या बियाणांची लागवड केली होती. याही वर्षी ht Bt बियाण्यांची लागवड झालेली आहे. शेतकरी लागवड करीत आहेत. याचाच अर्थ ते शेतकऱ्यांना इतर वाणाच्या तुलनेत परवडणारे आहे.

मागील वर्षी अकोली जहांगीर येथून शेतकरी संघटनेचे नेते ललित पाटील बाहाळे यांनी सविनय कायदे भंग करून किसान तंत्रज्ञान स्वातंत्र सत्याग्रह या आंदोलनाला सुरवात केली होती. यावर शासनाने अकोली जहागीर व अडगाव बु येथील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. या वर्षी किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य टप्पा -२ सुरवात करण्यात आली. यात शेतकरी संघटने तर्फे सर्व प्रथम बियाणे वितरित करण्यात आले.सरकारने शेती संबंधित संशोधनाच्या प्रयोगावर बंदी ठेवलेली आहे. ही बंदी उठवावी याची मागणी शेतकरी संघटना करीत आहे.जर सरकार बियाणांची चाचणी व निरीक्षण करीत नसल्याने शेतकरी बियाणांची चाचणी व निरीक्षण शेतकऱ्यांनी सुरू केलेले आहे. 


शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख (माहिती व तंत्रज्ञान आघाडी) लक्ष्मीकांत कौठकर यांच्या गोर्धनाआबा या शेतात ht Bt कपाशीच्या वाणाची चाचणी व निरीक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला.या पिकाचे निरीक्षण करून असे लक्षात आले की संपूर्ण शेतात तानानाशकाची केलेली होती. फक्त एका सरी ला तणनाशक मारलेले नव्हते.ज्या भागात तणनाशकाचा प्रयोग केलेला होता त्या भागातील संपूर्ण गवत नष्ट झालेले होते. एका सरीत तणनाशक वापरलेले नव्हते. तिथं खूप गवत झालेले असून एका सरीला तण काढणीकरिता मजुरी खर्च आठशे रुपये आलेला आहे हे उपस्थित शेतकऱ्यांच्या लक्षात आले. 

या निरीक्षणाला अनुसरून एकाच निदनचा खर्च एकरी चौदा हजार व डावरणीचा खर्च 1600 रुपये एकंदरीत तन निर्मूलनाचा एकरी खर्च 15600 रुपये येत आहे त्याच तुलनेत ht Bt या वानाला तणनाशक फवारले असता तणनाशक व मजुरी मिळून 520 रुपये खर्च येतो.म्हणजेच ht Bt मुळे 14800 रुपये एकरी शेतकऱ्यांची बचत होते. हे स्पष्ट झालेले आहे. दुसरा निष्कर्ष निदन ,डवरणी, वखरणी मुळे जमीन मोकळी होत असल्याने जमिनीतील आद्रता कमी होते,पिकाच्या मुळे कमजोर होतात. पीक पिवळे पडते. परंतु ht Bt मध्ये तणनाशकाचा फवारणी मुळे तण सोकून पिकात नैसर्गिक मल्चिंगचे काम करते. जमिनीतील आद्रता कायम राहते मुळांना इजा होत नाही. पीक प्रफुल्लित दिसते.या वेळी शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह चा फलकाचे अनावरण शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते  ललित दादा बाहाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटना माजी जिल्हा प्रमुख सतीश बाबा देशमुख, शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख(माहिती व तंत्रज्ञान आघाडी)लक्ष्मीकांत कौठकर,तालुका प्रमुख निलेश नेमाडे,युवा आघाडी दिनेश देऊळकार, अमोल मसुरकार,संजय ढोकने, मोहन खिरोडकार,दिनेश गिर्हे, जाफर खा, विलास इंगळे, गोपाल निमकर्डे, शेख आरिफ,आकाश देऊळकार,महेश उमाळे,शेख इस्माईल,संतोष चतारे, राजीक कुरेशी, नरेंद्र निमकर्डे,मकसूद मुल्लाजी, प्रल्हाद निमकर्डे व इतर शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या