Dr.B.R.Ambedkar:राजगृहावर अज्ञात माथेफिरू कडून तोडफोड

राजगृहावर अज्ञात माथेफिरू कडून तोडफोड


" संपूर्ण प्रकरण cctv त कैद झाला आहे.मात्र, पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी पोहचून चोखरिते आपलं कर्तव्य बजावलं. जनतेनी संयम पाळावा"  
प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते
मुंबई - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात माथेफिरूकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.राजगृहावर हल्ला करणारे पोलीसांनी तात्काळ अटक करावी अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होवून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्यासाठी हे कटकारस्थान असल्याचे वंचित बहूजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी सांगितले आहे. 

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले . आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामध्ये आरोपी दिसत आहे. हा महाराष्ट्र पेटविण्याचा नियोजित डाव असून, पोलीसांनी तात्काळ आरोपींना जेरबंद करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडी सह संपुर्ण आंबेडकरी समुहाने केली आहे.
.........

टिप्पण्या