Covid19:क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड व नवदिशा संस्थेच्या वतीने पत्रकारांना मास्क व सैनीटायजरचे वितरण

क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड व नवदिशा संस्थेच्या वतीने पत्रकारांना मास्क व सैनीटायजरचे वितरण


अकोला  : कोविड-१९ कोरोनाचे संक्रमण काळात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्याना क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड ग्रामीण कोटा व नवदिशा अकोला शाखाच्या वतीने पत्रकारांना मास्क व सैनी टायजरचे वितरण करण्यात आले. 

अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या शहर कार्यालया समोर झालेल्या प्रतिकात्मक छोटेखानी कार्यक्रमात संस्थेचे शाखाधिकारी दिनेश कोकाटे, क्षेत्रीय अधिकारी पवन बागडे ,अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब , सरचिटणीस प्रमोद लाजूरकर  यांच्या हस्ते पत्रकारांना मास्क व सैनी टायजर चे वितरण करण्यात आले.


कमलकिशोर शर्मा , दीपक देशपांडे , विजय केंदरकर , अकबर खान, मुकुंद देशमुख , मनीष खर्चे , सुधाकर देशमुख , समाधान खरात , मौर्य , नरेंद्र देशमुख , संस्थेचे अधिकारी संतोष मोरे, ऋषिकेश कागले,दीपक अवचार , पंकज निळे , वैभव कोंदे, आकाश फडके , चंद्रकांत काळे , आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

कोरोना संक्रमण काळात काम करताना पत्रकारांनी सुरक्षित साहित्य वापरून काम करावे, असे आवाहन मिरसाहेब यांनी केले. पंकज  बागडे यांनी यावेळी, संस्थेच्या वतीने कोरोना संक्रमण काळात काम करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस, अधिकारी , पत्रकार , आदींना मास्क व सैनी टायजर वितरणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे , आज अकोला येथे जिल्हा पत्रकार संघ , डी एस पी कार्यालय, तहसील कार्यालय , शहर व ग्रामीण पोलिस स्टेशन , शिंदखेड ग्राम पंचायत आदी ठिकाणी कोरोनाचे बचावासाठी साहित्याचे वितरण करण्यात आल्याचे सांगितले.संस्थेच्या या उपक्रमाची जिल्हा पत्रकार संघातर्फे प्रशंसा करण्यात आली.

टिप्पण्या