- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Covid19 impact:कोविडच्या पार्श्वभुमिवर कावड पालखी उत्सवासाठी नियमावली जारी; श्रीराजेश्वर मंदिर परिसरातील रहदारी मार्गात बदल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोविडच्या पार्श्वभुमिवर कावड पालखी उत्सवासाठी नियमावली जारी; श्रीराजेश्वर मंदिर परिसरातील रहदारी मार्गात बदल
अकोला,दि.२५: श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शिवभक्तांचे कावड व पालखीचे आयोजन मिरवणुक काढण्याची परंपरा आहे. तथापि, यावर्षी कोविड-१९ च्या संसंर्गजन्य आजारामुळे राज्यात साथरोग अधिनियम १८९७ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभुमिवर प्रत्येक सोमवारी तसेच शेवटच्या सोमवारी कावड पालखी उत्सवाबाबत खालील प्रमाणे नियमावली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी एका आदेशाद्वारे जारी केली आहे.
काय आहे नियमावली
१.उपविभागीय अधिकारी व संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच मंदीराचे विश्वस्त, कावड पालखीचे पदाधिकारी यांचेशी सल्ला मसलत करुन, मंदीराचे विश्वस्त यांचेकडून कावड पालखी करिता २० व्यक्तीच्या नावाची यादी प्राप्त करुन घ्यावी. मानाची एक कावड, पायदळ न आणता ठराविक वाहनांमधुन मंदिरातील स्थित पिंडीवर जलाभिषेक करण्याकरीता फक्त त्याच २० व्यक्तीना परवानगी देण्यात येईल.
२.श्रावण महिन्यातील सोमवार दि. २७जुलै , दि. ३ ऑगस्ट, दि. १० ऑगस्ट व दि. १७ ऑगस्ट या दिवशी येणाऱ्या सोमवारी संबंधीत नदिच्या ठिकाणी तसेच मिरवणूक मार्गावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करिता फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ नुसार संबंधीत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी स्वतंत्ररित्या प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करावे. या कालावधीत कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करता येणार नाही. तसेच पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येता येणार नाही याची दक्षता घ्यावी.
३.कावड पालखी करिता कोणत्याही प्रकारच्या ध्वनीक्षेपक साहित्याचा वापर करता येणार नाही.
४.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १७ मे रोजीच्या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळे व पुजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रम व यात्रा, जत्रा बंद ठेवण्यात आले आहेत.
५.मंदिरातील विश्वस्थ, पुजारी यांनाच पूजा अर्चना करण्याची मुभा राहील.
६.कावड पालखी करिता ज्या भाविकांना परवानगी देण्यात आली आहे, त्यांनी मास्कचा वापर तसेच सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहील.
७.ज्या शिवभक्तांना कावड पालखी करिता परवानगी देण्यात आली आहे. त्यांचे ॲन्टीजेन रॅपीड टेस्ट करण्यात यावे व त्यांचे अलगीकरण करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करावे.
या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून यातील अटींचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
श्रीराजराजेश्वर मंदिर परिसरातील रहदारी मार्गात बदल
अकोला शहरामध्ये श्रावण महिन्यात शिवभक्त श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. या कालावधीत वाहतुक सुरळीत राहण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी श्रीराजराजेश्वर मंदिर परिसरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
वाहतुक मार्गात केलेले बदल याप्रमाणे-
सध्या सुरु असलेला मार्ग-डाबकी रोड-जुने शहर-श्रीवास्तव चौक-विठ्ठल मंदिर-अलका बॅटरी चौक-जयहिंद चौक-कोतवाली चौक-गांधी चौक-अकोला बस स्थानक तसेच डाबकी रोड जुने शहर ते भिमनगर चौक दगडीपुल मार्ग, मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक व येणारे वाहतूक
पर्यायी मार्ग- डाबकी रोड-जुने शहर-भांडपुरा चौक-पोळा चौक-किल्ला चौक-हरिहरपेठ-वाशिम बायपास चौक-राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा ते लक्झरी स्टँन्ड सरकारी बगीचा- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन अशोक वाटीका ते अकोला बसस्थानक.
सध्या सुरु असलेला मार्ग- अकोला बस स्थानक-गांधी चौक- कोतवाली चौक-जयहिंद चौक-पोळा चौक, हरिहरपेठ-वाशिम बायपास चौककडे जाणारी व येणारी वाहतूक
पर्यायी मार्ग- अकोला बसस्थानक-अशोक वाटीका चौक-जिल्हाधिकारी कार्यालय-सरकारी बगीचा लक्झरी स्टँन्ड-वाशिम बायपास चौक-हरिहर पेठ-किल्ला चौक- भांडपुरा चौककडे जाणारी व येणारी वाहतुक.
.....
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा