Corona virus treatment:अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2623

अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2623

 

अकोला,दि.31:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 328 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 313 अहवाल निगेटीव्ह तर  15 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2623(2276+347) झाली आहे. आज दिवसभरात 26 रुग्ण बरे झाले. आता 422 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 19810 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 19241, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  402  नमुने होते. आजपर्यंत एकूण 19708 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  17432   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2623(2276+347) आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 15 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  एक महिला व चार पुरुष आहेत. त्यातील  सिंधी कॅम्प, माना, न्यू भिम नगर, मुर्तिजापर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व पाच पुरुष आहेत. त्यात अकोट येथील सहा जण, दहीहांडा अकोला येथील तीन जण तर जवाहर नगर अकबरी प्लॉट, अकोला येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

26 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11 जणांना तर कोविड केअर सेंटर अकोला येथून 15 जणांना अशा एकूण 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

422 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2623(2276+347) आहे. त्यातील  जण 105 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2096 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 422 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 577 चाचण्या, 14 पॉझिटिव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 577 चाचण्यामध्ये 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- 

अकोला ग्रामिण भागात  आज येथे 104 चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अकोट येथे 64 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. बाळापूर येथे चाचण्या झाल्या नाहीतबार्शीटाकळी येथे  126 चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. पातूर येथे  चाचण्या झाल्या नाहीत. तेल्हारा येथे 104 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आलामुर्तिजापूर येथे 95 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला तसेच अकोला मनपामध्ये 46 चाचण्या झाल्या त्यात आठ पॉझिटिव्ह आले आहे, अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 36 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे एकूण 577 चाचण्या होऊन त्यात 14 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 7528 चाचण्या झाल्या असून 367 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या