- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Corona virus news:कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन
देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत, याकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे लक्ष वेधले. मन की बात द्वारे ते देशवासियांशी संवाद साधत होते.
कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अनेक ठिकाणी तो वेगाने पसरत आहे. त्यामुळं सतर्क राहण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना केले आहे. पूर्वीइतकीच खबरदारी आजही घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे, एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे, सतत हात स्वच्छ करणे, कोठेही न थुंकणे आणि आणि स्वच्छता राखणे ही हत्यारेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतील, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते, त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करत रहावे, असेही ते म्हणाले.
चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे, एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे, सतत हात स्वच्छ करणे, कोठेही न थुंकणे आणि आणि स्वच्छता राखणे ही हत्यारेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतील, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते, त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करत रहावे, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात देशाच्या विविध भागात होत असलेल्या नवनव्या उपक्रमांचं कौतुक त्यांनी यावेळी केलं. तसेच देशात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.
येत्या १ ऑगस्ट २०२० रोजी लोकमान्य टिळकांची शंभरावी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचे अवघे आयुष्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे. आपल्या सर्वांना त्यांच्याकडून बरेच काही शिकता येईल, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
देशात काल दिवसभरात ३६ हजार १ शे ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकाच दिवसांच बरे होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ६३ पूर्णांक ९१ शतांश टक्यांवर पोहोचला आहे आणि मृत्यू दर २ पूर्णांक ३१ शतांश टक्के इतका कमी झाला आहे.
देशभरात आतापर्यंत एकंदर ८ लाख ८५ हजार पाचशे ७७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाख ६७ हजार आठशे ८२ आहे.
काल दिवसभरात कोविड १९ च्या ४८ हजार सहाशे ६१ नव्या रुग्णांची नोंद झाली, यामुळे देशातली एकुण कोविड रुग्ण संख्या १३ लाख ८५ हजार पाचशे २२ झाली आहे.
काल सातशे ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत कोविड १९ मुळे देशात ३२ हजार ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान कालच्या एका दिवसांत ४ लाख ४२ हजार २ शे ६३ विक्रमी चाचण्या देशभरातील विविध प्रयोग शाळांमधून करण्यात आल्या असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था म्हणजे आय सी एम आर नं म्हटलं आहे.
देशभरात आतापर्यंत १ कोटी ६२ लाख ९१ हजार ३३१ विक्रमी संख्येने चाचण्या करण्यात आल्याचं आय सी एम आर नं कळवलं आहे. देशभरतील कोविड-१९ च्या चाचण्या करण्यासासाठी नऊशे ५ सरकारी आणि चारशे २ खाजगी अशा एकूण तेराशे ७ प्रयोगशाळांमधून परीक्षण आहे.
राज्यभरात काल ७ हजार २२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत २ लाख ७ हजार १९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातल्या कोरोनामुक्तांची संख्या २ लाखापेक्षा अधिक
राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ५६ पुर्णांक ५५ शतांश टक्क्यांवर आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल कोरोनाच्या ९ हजार २५१ नवीन रुग्ण बाधित असल्याचं आढळलं. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत...........
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा