Corona virus news:बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त; दिल्ली दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर

बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त; दिल्ली दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर 

मुंबई: देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या साडेसहा लाखाच्या वर गेली आहे. देशभरात काल एका दिवसात १७ हजार ९९४ कोरोनाबाधित बरे झाले असून, बरे झालेल्यांची  एकूण संख्या ६ लाख ५३ हजार ७५१ झाली आहे.

देशातलं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६२ पूर्णांक ९३ शतांश टक्के, टक्के इतकं आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या, महाराष्ट्रात सर्वात जास्त असून,  दिल्ली दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या ३ लाख ५८  हजार ६९२ कोरोनाबाधितांवर देशभरात उपचार सुरू आहेत. 

 देशभरात काल ३४  हजार ८८४ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्यांची एकूण संख्या आता १० लाख ३८ हजार ७१६ इतकी झाली आहे. देशभरात काल ६७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनाबळींची एकूण संख्या २६  हजार २७३ झाली आहे. 

 देशात सध्या ८८५ शासकीय आणि ३६८ खाजगी, अशा एकूण १ हजार २५३ कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

राज्यात काल २ हजार २१७ रूग्ण बरे होऊन घरी परतले
आतापर्यंत एकूण १ लाख ६० हजार ३५७ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून रूग्ण बरे होण्याचा दरही वाढून, ५४ पूर्णांक ८२ शतांश टक्के झाला आहे.

राज्यात काल ८ हजार ३०८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचं निदान झालं, त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या, २ लाख ९२ हजार ५८९ इतकी  झाली आहे, त्या पैकी  सध्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात काल २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृत्यूंची एकूण संख्या ११ हजार ४५२ झाली आहे. राज्यातलं मृत्यूचं प्रमाण घटलं असून, सध्या मृत्यूदर ३ पूर्णांक ९१ शतांश टक्के इतका आहे. 


कोल्हापूरात येत्या सोमवारपासून सात दिवसांचा  लॉक डाऊन केला जाईल अशी घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल केली. लॉकडाऊन काळात औषध आणि दूध पुरवठा वगळता इतर सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत. 


मुंबईत काल ८०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ६९ हजार ३४० झाली आहे.

 मुंबईत काल १ हजार २१४ नवे कोरोनाबाधित निश्चित झाले असून आतापर्यंतची एकूण संख्या ९९ हजार १६४ झाली आहे. त्यापैकी २३ हजार ९४८ कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत.

 मुंबईत काल ६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानं, कोरोनाबळींची एकूण संख्या ५ हजार ५८५  झाली आहे. ८८५ संशयित रुग्ण काल भर्ती झाले, तर मुंबईत कालपर्यंत, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७०  टक्के होतं.
.........

टिप्पण्या