corona update:दिवसभरात 9 पॉझिटिव्ह; बाभुळगाव, बोरगाव मंजू, धोतर्डी, डाबकी रोड व पातूर येथे नवे रुग्ण

दिवसभरात 9 पॉझिटिव्ह; बाबुळगाव, बोरगाव मंजू, धोतर्डी, डाबकी रोड व पातूर  येथे नवे रुग्ण

*कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २८ जुलै २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २११*
*पॉझिटीव्ह- ९*
*निगेटीव्ह- २०२*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व पाच पुरुष आहेत. त्यात  बाबुळगाव येथील दोन जण, बोरगाव मंजू, धोतर्डी, डाबकी रोड व पातूर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून तीन जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून चार जणांना तर आयकॉन हॉस्पीटल येथून चार जणांना अशा एकूण २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१९६+२९२=२४८८
मयत-१०३, डिस्चार्ज- २०३१
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५४
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या