Corona update:*कोरोना अलर्ट*:दिवसभरात 29 पॉझिटिव्ह; गंगा नगरातील रुग्णाचा मृत्यू

*कोरोना अलर्ट*:दिवसभरात 29 पॉझिटिव्ह; गंगा नगरातील रुग्णाचा मृत्यू

*आज शनिवार दि. २५ जुलै २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ३२१*
*पॉझिटीव्ह- २९*
*निगेटीव्ह- २९२*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  एक महिला व चार पुरुष आहेत. त्यात पारस अकोला व सिरसार मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण तर मलकापूर, अकोला येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गंगानगर, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष असून तो दि. ११ जुलै रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून ४६ जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून सहा जण तर आयकॉन हॉस्पीटल मधून दोन जणांना अशा एकूण ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१४०+२४३=२३८३*
*मयत-१००, डिस्चार्ज- १९६६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३१७*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या