CBSE: सीबीएसईचा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

CBSE चा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई: सीबीएससीच्या बारावीच्या परिक्षेचा निकाल  सोमवारी घोषित झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे. यंदा या परिक्षेत एकूण ८८ पूर्णांक ७८ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीपेक्षा ५ पूर्णांक ३८ शतांश टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गुणवत्ता यादी घोषित न करण्याचा निर्णयही बोर्डानं घेतला आहे. यंदा ज्या विषयांच्या परिक्षा रद्द झाल्या होत्या त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्यात आले आहेत.

हे निकाल www.cbseresults.nic.in , www.cbse.nic.in आणि   www.results.nic.in.  या संकेतस्थळावर पाहाता येणार आहेत. हा निकाल दुरध्वनीच्या माध्यमातून 011- 24300699 या क्रमांकावरही मिळू शकेल. 



......

टिप्पण्या