CBSE Result:सीबीएसई दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर; मुलांपेक्षा मुलीच वरचढ

सीबीएसई दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर; मुलांपेक्षा मुलीच वरचढ

अकोला: CBSE, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल  जाहीर केला. त्यात सरासरी ९१ पूर्णांक ३१ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त, म्हणजे ९३ पूर्णांक ३१ शतांश टक्के आहे, तर यशस्वी झालेल्या मुलांचं प्रमाण ९० पूर्णांक १४ शतांस टक्के आहे.

तृतीयपंथी परीक्षार्थींपैकी ७८ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . त्रिवेद्रम विभागात सर्वाधिक ९९ पूर्णांक २८ शतांस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, गुवाहाटी विभागात सर्वात कमी, ७९ पूर्णांक १२ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण जाले आहेत.    

गेल्या वर्षापासून उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढत असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. विद्यार्थी आपला निकाल मंडळाच्या cbse.nic.in किंवा  cbseresults.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकतात. DigiLocker आणि Umang अपवरही निकाल पाहता येईल. 

'प्रभात'चा दीप उनडकाट ९८.४ टक्के गुणांसह प्रथम

प्रभातचा १०० टक्के निकाल; ५६ विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्याहून अधिक गुण 

सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा बहुप्रतिक्षित निकाल बुधवार दि. १५ जुलै रोजी घोषित झाला.प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या वर्षी उज्ज्वल यशाचा नवीन उच्चांक गाठला असून १०० टक्के निकालासह तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. दीप उनडकाट याने सर्वाधिक ९८.४ टक्के गुण प्राप्त केले असून तो शाळेतून पहिला आला आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रभात किड्स स्कूलने इयत्ता दहावीच्या निकालात सातत्य राखले आहे. प्रभात किड्सचे १९८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते. 'प्रभात'चा दीप उनडकाट याने ९८.४ टक्के गुणासह सामाजिक शास्त्रामध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले. 

प्रभात'च्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या ५६ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये टक्के गुण प्राप्त केले आहे. आस्था लोया ९८ व ख्याती लोहिया हीने प्रत्येकी ९८ टक्के गुण प्राप्त केले आहे. तसेच ध्रुव सारडा ९७.६, गायत्री मिश्रा ९७.४, हर्ष कुलकर्णी ९७.४, आदित्य राठी ९७.४, रसिका रहाने ९६.८, अंकुश पाटील ९६.६, सृष्टी म्हैसने ९६.६, ओम मानकर ९६.२, वेदांज बंकेवार ९६, अमिशा साहू ९६, साहिल वाडकर ९५.४, गायत्री धनोकार ९५.२, अर्थव दाबेराव  ९५.२, महिमा जैन ९५, तनया काकड ९४.८, ईशा सारडा ९४.६, अन्वेषा शेरेकर ९४.६, श्रेयस सरोदे ९४.४, सुहानी जाजू ९४, कुमुदिनी देशमुख ९४, राघव कुलकणी ९३.८०, प्रथमेश पवार ९३.८०, अखिलेश सोनी ९३.६, निमिष वानखडे ९३.४, वेदांत देशमुख ९३.४, विधी अंधारे ९३.४, हर्षल टाले ९३.४, अभिजीत बोचरे ९३, शंतनू साबळे ९३, प्रिया डोंगरकर ९३, साना चौधरी ९३, किषिता मित्तल ९२.६, आयुष कालमेघ ९२.६, नमन केसान ९२.४, तमानुद घुले ९२.४, इशिता डांगे ९२.२, सम्यक भारसाकळे ९२, प्रियांशु शर्मा ९१.८, प्राजंल कावरे ९१.८, आचल चांडक ९१.४, प्रियांशु शहा ९१.२, आयुषी बियाणी ९१, ओम भारंबे ९१, प्रियंका सुर्यवंशी ९०.६, प्रणव इंगळे ९१.६, आदित्य मसने ९१.६, शिवकुमार उन्हाळे ९०.४, जतिन भिमजियानी ९०.४, दिया तिवारी ९०.४, उदय जिरवनकर ९०.२, ऋषी माहेश्वरी ९० टक्के, चिन्मय चावला ८९.८ व  यश काळणे ९८.६ टक्के गुण प्राप्त केले आहेत. तर एकूण १९८ विद्यार्थ्यांपैकी १३० विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.  
यशस्वी विद्यार्थ्यांचे 'प्रभात'चे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, तज्ज्ञ संचालक कांचन पटोकार, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी व सर्व विभाग प्रमुख, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

'प्रभात'च्या २१ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले १०० पैकी १०० गुण
मराठीसह गणित, सामाजिकशास्त्र, संस्कृत या विषयांमध्ये प्रभातच्या  २१ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १००गुण प्राप्त केले आहेत. गायत्री धनोकार, उदय जिरवनकर व सृष्टी म्हैसने या तीन विद्यार्थांनी मराठी मध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. संस्कृतमध्ये हर्ष कुलकर्णी, ख्याती लोया, महिमा जैन, साना चौधरी, सुहानी जाजू, तमानूद घुले, किशिता मित्तल, कुमुदिनी देशमुख, प्रिया डोंगरकर, अमिषा साहू व विधी अंधारे या ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त करुन विक्रम प्रस्थापित केला आहे तर  गणितामध्ये आस्था लोहिया, ख्याती लोया, साहिल वाडकर, आदित्य राठी, प्रणव इंगळे, आयुष केसान या सहा विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे. तर ख्याती लोया या विद्यार्थीनीने संस्कृत व गणित विषयांमध्ये संपूर्ण गुण प्राप्त केले आहे.

अभिनंदन
धनंजय शर्मा
अकोला आयुर्वेद औषधालयचे संचालक राजेश कमलकांत शर्मा यांचे सुपुत्र व श्रीमती वीणादेवी कमलकांत शर्मा यांचे नातू धनंजय राजेश शर्मा याने CBSE दहावी परीक्षेत 94.2%गुण मिळविले.तो पुणे येथील कल्याणी स्कूलचा विद्यार्थी आहे.मोठे वडील निलेश शर्मा यांनी धनंजयचे कौतुक केले.💐

जान्हवी राजूरकर
नागपूर येथील वरिष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या संध्या राजूरकर यांच्या भाची खुशी उर्फ जान्हवी अविनाश राजूरकर हिने CBSE दहावी परीक्षेत 96.4%गुण मिळविले.💐

शंतनु साबळे
अकोल्यातील वरिष्ठ पत्रकार धनंजय साबळे यांचे पुत्र शंतनु साबळे याने CBSE दहावी परीक्षेत 93%गुण मिळविले.💐

टिप्पण्या