Akola ZP:सौरभ कटियार अकोला जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’

सौरभ कटियार अकोला जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’ 


अकोला: जानेवारी पासून रिक्त असलेल्या अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौरभ कटियार यांची शासनामार्फत मंगळवारी नियुक्ती झाली आहे. कटियार हे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी या पदर कार्यरत होते.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची २३ जानेवारी २०२० रोजी शासनामार्फत बदली करण्यात आली होती. त्यामुळे रिक्त असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार सांभाळत होते. रिक्त असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर  सौरभ कटियार यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत १४ जुलै रोजी देण्यात आला.कटियार अकोला जिल्हा परिषदेत लवकरच रुजू होणार आहेत. कटियार हे भारतीय प्रशासन सेवेतील (भाप्रसे) २०१६ च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

या IAS अधिकाऱ्यांच्या बदली

*श्री सौरभ कटियार सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू पालकर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला या रिक्त पदावर

* श्री कुमार आशीर्वाद सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली या रिक्त पदावर

*श्री श्रीकृष्णनाथ पांचाळ सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया या रिक्त पदावर

*श्रीमती इंदू राणी जाकर सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या पदावर

*श्री अभिनव गोयल सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट नांदेड यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर या रिक्त पदावर

टिप्पण्या