Corona treatment:अकोलेकरांनो सावधान! आतापर्यंत एकूण १७९७ कोरोनाग्रस्त...

अकोलेकरांनो सावधान! आतापर्यंत एकूण १७९७ कोरोनाग्रस्त...

*३७० अहवाल प्राप्त; १८ पॉझिटीव्ह, ११ डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि.८:आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३७० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३५२ अहवाल निगेटीव्ह तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले.  आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १७९७  झाली आहे. आज दिवसभरात ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले.  तर आज पहाटे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. आजअखेर ३६२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १३२३१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १२८२१फेरतपासणीचे १५४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २५६ नमुने होते. आजपर्यंत एकूण १३११७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ११३४१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १७९७ (१७७६+२१)आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज १८ पॉझिटिव्ह
आज  दिवसभरात १८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात नऊ महिला व तीन पुरुष आहेत. त्यात तीन जण अकोट येथीलतेल्हारा,बोरगाव व पारस येथील प्रत्येकी दोन तर सातव चौकबाळापूर व वाशीम बायपास येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी   सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व दोघे पुरुष आहेत.  त्यातील दोन जण महान येथीलदोन जण अकोट येथील तर उर्वरित धोत्रा मुर्तिजापूर व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून देण्यात आली.
११ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात तर कोविड केअर सेंटर मधून चार अशा ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ते दोघे बाळापूरदोघे अकोटदोघे दगडी पूल येथील तर उर्वरीत अकोट फैलआगरवेसजेल क्वार्टर,  सोनटक्के प्लॉटमोठी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.
एका महिलेचा मृत्यू
दरम्यान उपचार घेताना वाशीम बायपास येथील ६० वर्षीय महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. या महिलेस दि. ३० जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
३६२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण १७९७ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९१ जण (एक आत्महत्या व ९० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १३४४ आहे. तर सद्यस्थितीत ३६२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात18 पॉझिटिव्ह

*आज बुधवार दि. ८ जुलै २०२० रोजी  सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३७०*
*पॉझिटीव्ह- १८*
*निगेटीव्ह- ३५२*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी   सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व दोघे पुरुष आहेत.  त्यातील दोन जण महान येथील, दोन जण अकोट येथील तर उर्वरित धोत्रा मुर्तिजापूर व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
 दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात तर कोविड केअर सेंटर मधून चार अशा ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ते दोघे बाळापूर, दोघे अकोट, दोघे दगडी पूल येथील तर उर्वरीत अकोट फैल, आगरवेस, जेल क्वार्टर,  सोनटक्के प्लॉट, मोठी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १७९७*
*मयत-९१ (९०+१), डिस्चार्ज- १३४४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३६२* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
.........

टिप्पण्या