World yoga day:प्रभात'च्या विद्यार्थांनी केला 'योगा विथ फादर'

प्रभात'च्या विद्यार्थांनी केला 'योगा विथ फादर'



औचित्य योगा आणि फादर्स डे  

हजारोच्या विद्यार्थ्यांनी घेतला घरूनच सहभाग   

अकोला: आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सी.बी.एस.ई व फिट इंडिया मुव्हमेन्ट अंतर्गत 'योगा ऍट होम, योगा विथ फॅमिली' या उपक्रमात प्रभात किड्स स्कूलच्या हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच योगा कर्यक्रमास 'फादर डे' ची जोड देत प्रभातच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांसमवेत योगा करून 'योगा विथ फादर'  या उपक्रमाद्वारे आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.  
        
कोव्हीड १९ च्या पृष्ठभूमीवर आपल्या स्वस्थ व निरोगी आयुष्यासाठी योग महत्त्वपूर्ण असून रविवारी साजरा झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्य जगभरात  कार्यक्रम आयोजित केले होते. यासाठी प्रभातच्या योगा खेळाडूंची घरीच चित्रित  केलेली चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. 


सकाळी ७ वाजता राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित योग कार्यक्रम प्रभातच्या विद्यार्थांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत बघितला. त्यानंतर विद्यार्थांनी त्यांच्या वडिलांसोबत योगा करून त्यांच्या आपल्या पाल्याप्रती असलेल्या समर्पणासाठी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संध्याकाळी ५ वाजता प्रसारित लाईव्ह योगा सेशन मध्येदेखील विद्यार्थांनी सहभाग घेतला.   


या कार्यक्रमातील उत्स्फूर्त सहभागासाठी प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे व  वंदना नारे यांनी विद्यार्थ्यांसह पालकांचे अभिनंदन केले. प्रभातच्या शैक्षणिक संचालक कांचन पटोकर व प्राचार्य वृषाली वाघमारे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी प्रयत्न केले.
.........

टिप्पण्या