World yoga day:यंदाचा वर्ल्ड योगा डे प्रथमच डिजिटल मंचावर ! This year's World Yoga Day is on the digital stage for the first time

 दिन विशेष:२१ जून

यंदाचा वर्ल्ड योगा डे प्रथमच डिजिटल मंचावर!

*योग दिनाची थीम 'घरी योग आणि कुटूंबासह योग'.


*पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला देतील संदेश  
 
*संदेश सकाळी ६.३० वाजता दूरदर्शनवर प्रसारित 

#माय-लाइफ-माय-योग-इंडिया


नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आंतरराष्ट्रीय योग दिन यंदा कोरोना साथीच्या साथीने साजरा होणार आहे,असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण यावर्षीचा योग दिवस  कोरोना मुळे  पहिल्यांदाच डिजिटल मीडिया मंचांवर साजरा करण्यात येणार आहे. लोक गर्दी करून एकत्रित येऊ नये, यासाठी रस्त्यावर, मैदानात आणि उद्यानात साजरा केला जाणार नाही. योग दिन निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला सकाळी ६.३० वाजता संदेश देणार आहे.

प्राचीन काळापासून भारतात योग 
भारतात योगाची परंपरा खूप प्राचीन आहे.  हजारो वर्षांपूर्वी भारतात योगासन केले जात असल्याचे दाखले मिळतात.असे मानले जाते की, संस्कृती सुरू झाल्यापासून योगाचा अभ्यास केला जात आहे.  म्हणजेच योगाचा जन्म प्राचीन धर्म अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा श्रद्धा,परंपरा, प्रथा,संस्कार आदी प्रचलित होण्यापूर्वी पासूनच आहे. योगामध्ये भगवान शिवांना "आदि योगी" आणि "आदि गुरु" मानले जाते. भगवान शिव आणि माता पार्वती यांनी  योग उत्पत्ती केली असल्याचे काही प्राचीन ग्रंथात उल्लेख आढळतो.

२०१५ मध्ये जागतिक स्तरावर
२१ जून २०१५ रोजी जगात प्रथमच योग दिवस साजरा करण्यात आला.तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु यंदा  प्रथमच डिजिटल प्लॅटफॉर्मवर  योग दिवस साजरा करण्यात येत आहे. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत 'आंतरराष्ट्रीय योग दिन' दरवर्षी २१ जून रोजी साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.


 घरी योग आणि कुटुंबासह योग
यंदाच्या योग दिनाचा विषय म्हणजे 'घरी योग आणि कुटूंबासह योग' आणि २१ जून रोजी सकाळी सात वाजता लोक डिजिटल समारंभात सहभागी होऊ शकतील. विदेशातील भारतीय दूतावास योगास पाठिंबा देणार्‍या संस्थांसह डिजिटल माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
आयुष मंत्रालयाने लेहमध्ये एक मोठा कार्यक्रम करण्याची योजना आखली होती परंतु साथीच्या रोगामुळे तो रद्द करण्यात आला. आयुष मंत्रालयाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मंचांवर साजरा केला जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश या दिवसाचे मुख्य आकर्षण असेल. तसेच "कोविड -१९ च्या सध्याच्या जागतिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीमुळे यावर्षी अशा समारंभांवर कमी लक्ष दिले जात आहे. त्यामुळे लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत घरात योग करण्याकडे जास्त लक्ष देत आहेत.

थेट प्रक्षेपण

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या पथकाने ४५ मिनिटांच्या जनरल योग प्रोटोकॉल (सीवायपी) चे थेट प्रक्षेपणानंतर पंतप्रधानांचे भाषण प्रसारित केले जाते.
सीवायपी प्रथा वेगवेगळ्या वयोगटातील आणि वेगवेगळ्या लोकसमूहांच्या लक्षात ठेवून तयार केली गेली आहे.

योग दिन प्रासंगिक

यंदाचा योग दिन प्रासंगिकच आहे.कारण योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. मन प्रसन्न राहते. परिणामी कोणत्याही रोगांविरूद्ध लढण्याची शारीरिक क्षमता वाढवते. सध्याच्या  कोरोना संकटावर मात करण्यासाठी योगाभ्यास करणे अत्यावश्यक झाले आहे. परंतू, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे खुल्या मैदानात योग दिन साजरा न करता, घरी राहूनच योगासने करून योग दिन साजरा करण्याचे आवाहन आयुषने केले आहे.


'माय लाइफ-माय योगा' व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धा 
मंत्रालय आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने (आयसीसीआर) योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि 'माय लाइफ-माय योगा' व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेद्वारे लोकांना प्रेरित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.पंतप्रधानांनी ३१ मे रोजी ही स्पर्धा सुरू केली.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी, तीन योग प्रक्रियेचा तीन मिनिटांचा व्हिडिओ (क्रिया, आसन, प्राणायाम, बंद किंवा मुद्रा) अपलोड करावा लागतो. ज्यामध्ये या योग प्रक्रियेमुळे त्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला आहे,  याबद्दल एक लघु व्हिडिओ संदेश देखील दयावा लागतो.


स्पर्धेच्या माय लाइफ माय योग इंडिया या हॅशटॅगसह व्हिडिओ फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्रामवर अपलोड केला जाऊ शकतो.  युवकांच्या तीन श्रेणींमध्ये (१८ वर्षांखालील मुले आणि मुली), प्रौढ (१८ वर्षांवरील पुरुष आणि स्त्रिया) आणि योग व्यावसायिक (पुरुष आणि स्त्रिया) अंतर्गत प्रवेश पाठविले जाऊ शकतात.
प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर आलेल्या भारतीय स्पर्धकांना अनुक्रमे १ लाख, ५०,००० आणि २५,००० रुपये बक्षीस दिले जाईल.
जागतिक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन अनुक्रमे २,५००,  १,५०० आणि १००० डॉलर देण्यात येईल. 
.......................................




टिप्पण्या