Vitthal Mandir pandharpur: यंदा घरीच अवतरणार अवघी पंढरी...घरबसल्या ऑनलाईन घेता येईल दर्शन

यंदा घरीच अवतरणार अवघी पंढरी...

घरबसल्या ऑनलाईन घेता येईल दर्शन

आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत करण्यात आलेल्या या ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा


भारतीय अलंकार

अकोला: महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल-रुख्मिणी. आषाढ एकादशीला आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अवघा महाराष्ट्र पंढरपूरला पोहचतो.मात्र,यंदा कोरोनाचे सावट असल्याने श्री विठ्ठलाच्या पायी माथा टेकवण्यासाठी वारकरी पंढरीला जावू शकणार नाही. भाविकांची दर्शनासाठीची तळमळ लक्षात घेता मंदिर व्यवस्थापन समितीने ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरदेखील बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर दर्शनासाठी बंद असून या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. मंदिर बंद असल्याने भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची आता ऑनलाईन थेट सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.


विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन

• संकेतस्थळ- http://www.vitthalrukminimandir.org
• गुगल प्ले स्टोअरवरील ॲप- shreevitthalrukmnilive Darshan
• जिओ टीव्ही- जिओ दर्शन
• टाटा स्काय- ॲक्टिव्ह चॅनेल

वरील विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार  भाविकांना पाहता येणार आहे.

Vidio पाहण्यासाठी खालील red line वर क्लीक करा

हे सुद्धा पहा:विदर्भातील अकोला येथील प्राचीन श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर.

१ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा कोरानाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी सोडता येणार नाही. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्शनास पंढरपूरात येणे टाळावे. भाविकांनी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत करण्यात आलेल्या या ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी  जोशी यांनी केले आहे.

.......................





टिप्पण्या