- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना निवारणार्थ गुरूदेव सेवा मंडळाची मुख्यमंत्री निधीत मदत
रुपये ७१०००चा धनादेश सुपूर्द
अकोला: मानवता हा आपुला धर्म असून, संकटकाळात मानवी समाजाकरीता धावून जाणे या राष्ट्रधर्माचे पालन करावे, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संदेशानुसार व अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ, गुरूकुंज मोझरी यांचे आवाहनानुसार, अकोला जिल्हा गुरूदेव सेवामंडळाकडून रू ७१००० चा धनादेश कोरोना निवारणार्थ मुख्यमंत्री निधीमध्ये देण्यात आला.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
अकोला जिल्ह्यातील गुरूदेव उपासकांच्या यथाशक्ती आर्थिक सहयोगातून हा निधी गोळा करून त्याचा धनादेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थित होती.
याप्रसंगी जिल्हासेवाधिकारी रविन्द्र मुंडगावकर, केंन्द्रीय कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, जिल्हा प्रचारप्रमुख डॉ.अशोक रत्नपारखी, जिल्हा कोषाध्यक्ष दीपक आखरे, प्रा.राजाभाऊ देशमुख, संजय देशमुख, ज्ञानदेव भाकरे,दयाराम बावणे, ॲड.श्रीदेवी साबळे, ज्ञानदेव मानकर, प्रदिप गिरे, पांडूरंग इंगळे, मधुकर देशमुख, काशिराम लोखंडे, रामराव देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
...................................
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा