Teacher Crime:शिक्षक समृद्धि कर्मचारी सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार; १२ व्यक्तींवर गुन्हे दाखल

शिक्षक समृद्धि कर्मचारी सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार; १२ व्यक्तींवर गुन्हे दाखल
*कॅनरा बँक व ओरीयंटल बँक येथील अकाँऊट  केले सिल


*सहकार विभाग,अकोलाची कार्यवाही

*पतसंस्थेच्या संचालकांवर फोजदारी गुन्हा दाखल

*विनायक तायडे, लेखापरीक्षक यांनी शोधला २३ लाखांचा गैरव्यवहार

*अतिरीक्त भागभांडवल, अनामत, रकमा काढणे, खोट्या नोंदी घेऊन रकमा काढणे, खर्चाची बिले नसतांचा रक्कमा अदा करणे, बोगस सभासद दाखवुन रकमा अदा करणे आदी गैरव्यवहार 

* डाॅ प्रविण लोखंडे, उपनिबंधक सहकारी संस्था यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे दिले निर्देश

अकोला:  शहर महानगर पालिका शिक्षक समृद्धि कर्मचारी सहकारी पतसंस्थेतं सन 2012-17 मध्ये झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे  चाचणी लेखापरीक्षण विनायक तायडे, लेखापरीक्षक श्रेणी-२ यांनी करुन गैरव्यवहाराचा विशेष अहवाल तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयास सादर केला. त्या अहवाला नुसार २३,०२,९६३ एवढ्या रकमेचा गैरव्यवहार निदर्शनास आला आहे.

या गैरव्यवहाराचे अनुषंगाने डाॅ प्रविण लोखंडे, उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी दिलेल्या आदेशानुसार, काल शनिवार २७ जून रोजी रात्री ११.३० वाजता  शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्षासह इतर १० संचालक व व्यवस्थापक अशा एकुण १२ व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

गुन्ह्याची नोंद भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ४०९, ४१८, ४६७, १२०ब, २०१, ५०६, ३४ व  महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तिय संस्थामधील हितसंंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ नुसार करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय गावंडे करीत आहेत.
.........

टिप्पण्या