Sushant singh Rajput: संघर्षातून समृद्धीकडे...वाटचाल अर्ध्यावरच!निमित्त सुशांत सिंह आत्महत्या... From struggle to prosperity ... the journey is only half over! Sushant Singh's suicide on the occasion .. (Special Artical)

संघर्षातून समृद्धीकडे...वाटचाल अर्ध्यावरच!

निमित्त सुशांत सिंह आत्महत्या...

नशिब आणि संघर्ष एकाच नाण्याची दोन बाजू असून, नाणे कोणत्याही बाजूने पडले तरी ते आपलेच राहणार आहे. नाण्याची केवळ एक बाजू फायदयाची समजून घेणे फार मोठी चूक आहे. संघर्षातून संपन्न झालेल्या ( संपन्नतेचं नेमक मापदंड किती हे आजवर निश्चित झाले नाही ) जीवनातून व्यक्तीगत किंवा सामाजिक स्तरावर समृद्धीकडे वाटचाल करणारी व्यक्ती स्व:ताला का संपवण्याचे कृत्य करते. हा प्रश्न सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येमुळे पुन्हा उभा ठाकला आहे. 

दोन वर्षापूर्वी जून मध्येच भैय्युजी महाराजांची आत्महत्या!
दुर्देव म्हणजे ठीक २ वर्षा पूर्वी म्हणजे ११ जून २०१८ रोजी भैयूजी महाराज यांनी सुशांत सिंह सारखा निर्णय घेवून जीवन संपविले होते. अवघ्या ३५-४० या वयात नावलौकिक असताना,टोकाचा निर्णय का ? भैयूजी महाराज यांच्या नंतर दुर्देवाने हिमांशू राय, अनिकेत म्हैसकर यांनी देखील आत्महत्येचा मार्ग पत्करला होता. आता पुन्हा सुशांत सिंहने आत्मघात केल्याने, समाजमन  ढवळून निघत आहे आणि कोरेना काळात ही घटना घडल्याने त्यात अधिकची भर पडली आहे. 

आत्महत्या या चक्रात समान सुत्र असण्याचे कारण कोणते ?

मातब्बर , प्रतिष्ठीत व आयकाॅन असलेल्या व्यक्ति जर असे पाऊल उचलत असेल तर,? संपन्नता आणि आत्महत्या, वैभव आणि आत्महत्या, गरिबी व आत्महत्या, अध्यात्म आणि आत्महत्या या चक्रात आत्महत्या एक समान सुत्र असण्याचे कारण कोणते ? गर्भातून या जगात येण्यासाठी ‘ जीवा’ चा सुरू होणारा संघर्ष हा देह सरणावर गेल्या वर संपतो. हा संघर्ष कोणालाही सुटला नाही.की कोणाची या मधून सूटका झाली नाही. जीवनाचे दुसरे नावचं संघर्ष असून,या शिवाय जीवनालाच चकाकी नाही. संघर्ष नसेल तर जीवन म्हटले जाईल काय ? दर दिवस संघर्षांशिवाय जीवन विस्तृत होऊ शकत नाही. या संघर्षांतून नेमका मार्ग स्व:ताला शोधावा लागतो आणि त्या मार्गाने प्रवास सुरू  केला की, नेमके कोठे थांबून पुन्हा पुढे जावे. हा समजुतदारपणा ही बाळगावा लागतो. हे समजुतदारपण किंवा ही समज शक्य आहे. केवळ संयम हंवा. एक महत्वाचा टप्प्या पार केला की,पुढे आणि पुढे जाण्या पेक्षा कोठे तरी थांबून केलेल्या प्रवासाचे सिंहावलोकन करने आवश्यक आहे. पद,पैसा आणि प्रतिष्ठेने मोठे होत असताना, मनाने एकटे तर होत नाहीना, हे वास्तव तपासून घेण्या साठी थांबणे गरजेचे आहे आणि जर तपासून बघितले नाही. तर दुर्देवाने घात झाल्या वीना राहत नाही. जीवन जगण्याचे हेच सुत्र आहे. मात्र पुढे आणि पुढे जाण्यात भान राहत नाही आणि भान येते तेव्हा वेळ राहत नाही.वेळ निघून जाऊन काळ आपला डाव साधतो.                शेवटी हेच 
      सबकी बात ना माना कर, 
      खूद को भी पहचाना कर।                      दुनिया में जीना है तो,                             कुछ अमृत पीना है तो ।                         अपनी और निशाणाकर.   


                                    लेखक
                              गजानन सोमाणी
                                    अकोला

टिप्पण्या