Sport: खेळाडू क्रीडागुण सवलत प्रस्ताव सादर करण्यासाठी शनिवार पर्यंत मुदतवाढ

खेळाडू क्रीडागुण सवलत प्रस्ताव सादर करण्यासाठी शनिवार पर्यंत मुदतवाढ

अकोला,दि.१६: माध्यमिक व  उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या अथवा सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ जून रोजीच्या  सुधारीत शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. 


हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला  आहे. या शासन निर्णयान्वये राज्यात उद्भवलेल्या कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण असामान्य परिस्थितीमुळे व विद्यार्थ्यांचे हित लक्षात  घेता कोणताही  खेळाडू क्रीडा गुण सवलतीपासून  वंचित राहु  नये, या उद्दात हेतुने क्रीडा गुण सवलतीने परिपुर्ण  प्रस्ताव दोन प्रतीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शनिवार  २० जुन पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांचे कडे सादर करावे, अशी माहिती  प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली.

...........................



टिप्पण्या