Sport chess:चेकमेट: बुद्धिबळ आणि लॉकडाऊन Checkmate .... Chess ... and ... Lockdown

चेकमेट: बुद्धिबळ आणि लॉकडाऊन!
ज्यांना बुद्धिबळाविषयी काहीही माहीत नाही किंवा जे बुद्धिबळ सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी आज मी ‘बुद्धिबळ म्हणजे काय?’ याविषयी थोडक्यात सांगणार आहे. बुद्धिबळ हा खेळ दोन खेळाडूंत खेळला जातो व ह्या खेळाचे अंतिम ध्येय म्हणजे प्रतिस्पर्धी खेळाडूवर विजय मिळविणे म्हणजेच त्याच्या राजाला ‘चेकमेट’ करणे.
 १) बुद्धिबळ खेळाच्या तीन  अवस्था असतात . पहिली सुरुवात (Opening),  दुसरी मध्यपर्व (Middle Game) आणि तिसरी शेवट (End Game). खेळ जिंकण्यासाठी खेळायचा असतो म्हणजेच खेळाचे अंतिम ध्येय  "जिंकणे" हेच आहे म्हणून हा खेळ शिकताना पहिले शेवट, मग मध्यपर्व आणि सुरुवात असा शिकावा. 
२) या खेळाच्या प्रत्येक अवस्थेत वेगवेगळे हेतू असतात, सुरुवातीच्या चालींचा हेतू असतो डावाचा विकास करणे (Development), मध्यपर्वाचा हेतू असतो स्थितिवचक वस्तुनिष्ठ लाभ (Positional Advantage) आणि शेवट या अवस्थेचा हेतू असतो शह आणि मात (Checkmate). 
३) नवोदित खेळाडूंनी पटाकडे विशेष लक्ष द्यावे.  पटावर एकूण ६४ चौकोन  असतात त्यापैकी मधले ४ चौकोन अत्यंत महत्वाचे असतात. जो  खेळाडू या चौकोनांचा ताबा मिळवतो व कायम ठेवतो  त्याची जिंकण्याची शक्यता वाढते.  
४) खेळाडूंनी सुरुवातीच्या चालींमधील सापळ्यांचा (ट्रॅप) विशेष सराव करावा, त्याने आपला खेळ सुधारायला मदत होते  
५) विश्वविख्यात बुद्धिबळ खेळाडूंचे सामने अभ्यासावे ; विशेषतः विश्वनाथन आनंद,   गॅरी कॅस्पारॉव व आताचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन  ; त्याने खेळ सुधारतो.
आता काही समजूती आणि गैरसमजूतींचे निराकरण करू या!

*चांगला खेळ ही बुध्दीवान लोकांची मिरासदारी आहे.

*इतर खेळात जशी सरावाची गरज असते तसाच सराव या खेळात पण करावा लागतो. जर सराव नसेल तर तर बुध्दीपण साथ देत नाही.

*बिल गेट्स आणि  कार्लसन यांच्यातील सामना बघा. एक मायक्रोसॉफ्टचा मालक तर एक विश्वविजेता दोघेही अत्यंत बुद्धिमान या सामन्यांमध्ये बिल गेट्सचा पराभव फक्त नऊ चालींत झाला.

*बुद्धिबळ  मध्ये ऐन वेळेवर चाली सुचल्या पाहिजेत असा काहींचा आग्रह असतो. 
होय, अचानक सुचलेली चाल हे बुध्दीमंत असल्याचे लक्षण आहेच पण सतत अभ्यास असणे हे आवश्यक आहे. कार्लसनसारखा खेळाडू एका वेळेस दहा हजार गेम लक्षात ठेवतो. इतकेच नव्हे तर गॅरी कॅस्परॉवला हरवलेला संगणक ’आयबीएम डीप ब्ल्यू’ हा एकावेळी स्वत:च्या आणि गॅरीच्या अशा दोघांच्या मिळून पुढच्या चाळीस चालींचा अभ्यास करून मगच  चाल खेळत असे. 
बुद्धिबळात जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडू बद्दल मनात पूर्वग्रह नसावेत. 

लॉकडाऊन मधील बुद्धिबळाची परिस्थिती

जागतिक महामारी घोषित झालेल्या कोरोना ना मुळे आतापर्यंतचा सर्वच स्तरावरील बुद्धिबळाच्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. पण बुद्धिबळ हा खेळ ऑनलाइन पण खेळला जातो. त्यामुळे सध्या  ऑनलाइन बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडुंची प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना फिडेने  चेकमेट कोरोनाव्हायरस हा उपक्रम नुकताच सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे जगभरातील प्रत्येक खेळाडूसाठी दिवस रात्र  ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे, कारण हा ऑनलाइन खेळ आहे जो या  काळात मोठ्या बदलाशिवाय ऑनलाइन खेळला जाऊ शकतो. १८ मे २०२० पासून सुरवात झाली आहे, ह्या स्पर्धा पुढील ३० दिवसांसाठी १६ जून पर्यंत दररोज   विविध ऑनलाइन  बुद्धीबळ प्लॅटफॉर्मवर असतील. सर्व स्पर्धेमध्ये प्रवेश निशुल्क देण्यात येत आहे, या स्पर्धेमध्ये भरपूर आकर्षक बक्षिसे पण ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये विजेत्या खेळाडूला मॉस्को येथे २०२१ च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडला एक आठवड्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच  एकूण बक्षिसे 1500 हून अधिक आहेत.  अधिक माहितीसाठी, कृपया जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या अधिकृत साइटला नक्की भेट द्या.

लॉकडाऊन नंतर कशी असेल परिस्थिती?

आतापर्यंत सर्वच स्थरावरील बुद्धिबळ स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बुद्धिबळ स्पर्धामध्ये १००० च्या संख्येने  खेळाडू सहभागी होतात त्यामुळे आताची परिस्थिती बघता पुढील ६-७ महिने तरी बुद्धिबळाच्या कुठल्याच अधिकृत स्पर्धा होणार नाहीत आणि स्पर्धामध्ये सहभागी होणारे लहान खेळाडू खूप असल्या कारणामुळे पालक कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत तरी मुलांना कुठल्याच स्पर्धेत खेळवणार नाहीत,जवळपास बुद्धिबळाच्या स्पर्धा सुरळीत चालू होण्याकरिता १वर्ष तरी लागेल तेव्हा आता ऑनलाइन बुद्धिबळ हा एक चांगला पर्याय खेळाडूंना आहे.
चला तर मग कोरोना ला हरविण्यासाठी बुद्धिबळाचा उपयोग करू या!

लेखक
प्रवीण हेंड
जागतिक बुद्धिबळ संघटना फिडे मान्यताप्राप्त प्रशिक्षक
.................................................
Checkmate .... Chess ... and ... Lockdown
For those who don't know anything about chess or want to start chess, today I am going to tell you a little bit about 'What is chess?'  The game of chess is played between two players and the ultimate goal of the game is to defeat the opponent and checkmate his king.

 1) There are three stages of chess.  The first opening, the second middle game and the third end game.  If you want to play to win the game, then the ultimate goal of the game is to "win", so when learning this game, you should learn first the end, then the middle and the beginning.

 2) Each stage of the game has different objectives, the initial moves are aimed at the development of the left, the middle stage is aimed at positional advantage and the end stage is aimed at checkmate.

 3) Newcomers should pay special attention to the plate.  There are a total of 64 squares on the plate, out of which 4 squares in the middle are very important.  The player who captures and maintains these fours increases his chances of winning.

 4) Players should practice trapping in the early moves, it helps to improve their game.

 5) Study the matches of world famous chess players;  Especially Viswanathan Anand, Gary Kasparov and current Jagjjeta Magnus Carlson;  He improves the game.

Now let's resolve some misunderstandings and misunderstandings 

*Good sportsmanship is the legacy of the wise.

*You have to practice in this sport just like you need to practice in other sports.  If there is no practice, then intelligence does not accompany.

*Watch the match between Bill Gates and Carlson.  Bill Gates lost in just nine innings in a match between a Microsoft owner and a world champion.


*In chess, some people insist that moves should be made on time.
Yes, a sudden move is a sign of intelligence, but it requires constant study.  A player like Carlson remembers ten thousand games at a time.  Not only that, but IBM Deep Blue, the computer that Gary Kasparov lost, was playing the next forty moves at the same time, studying the next forty moves by himself and Gary.

There should be no prejudice in mind about rival players to win in chess.


 Chess situation in lockdown 


The corona, which has been declared a global pandemic, has so far canceled all levels of chess

The game of chess is also played online, so there is a huge increase in the number of players playing chess online.  The world chess association FIDE has recently taken the initiative to launch the Checkmate Coronavirus initiative, organizing a day and night online chess tournament for every player around the world, as it is an online game that can be played online without major changes during this period.  The tournament, which started on May 18, 2020, will be held daily on various online chess platforms for the next 30 days till June 16.  Admission to all competitions is free, with lots of attractive prizes, including a one-week invitation to the 2021 Chess Olympiad in Moscow, with a total prize pool of over 1,500.  For more information, please visit the official site of the World Chess Federation.


What will be the situation after lockdown? 

 So far, chess tournaments at all levels have been canceled.  As many as 1000 players participate in the chess tournament, so given the current situation, there will be no official chess competitions for the next 6-7 months, and due to the large number of young players participating in the tournament, the parents will not play the children in any competition until the corona is under control.  With at least a year to go, online chess is now a great option for players.

So let's use chess to defeat Corona!


 Praveen Hend

World Chess Association FIDE Accredited Instructor
........................

टिप्पण्या