Sport Carrom:के श्रीनिवास व रश्मी कुमारी ऑनलाइन कॅरम स्पर्धेत आघाडीवर

के श्रीनिवास व रश्मी कुमारी ऑनलाइन कॅरम स्पर्धेत आघाडीवर


अकोला: माजी विश्व कप विजेता के श्रीनिवास आणि दोन वेळा विश्वविजेती रश्मी कुमारी यांनी प्रथम वर्ल्ड ऑनलाइन कॅरम चॅलेंज इंडिया २०२० या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून पहिल्या फेरीत आघाडी घेतली.
विश्वविजेता प्रशांत मोरे याला मागे टाकून श्रीनिवास याने आठ बोर्डात २३ संधीमध्ये १ अल्टिमेट आणि २ ब्लॅक स्लॅम घेत सर्वोत्तम कामगिरी केली व १६ क्रेडीट गुणामुळे त्याचे स्कोर कमी होऊन ७ झाला. प्रशांतला आठ बोर्ड २४ चान्स मध्ये ३ ब्लॅक स्लॅमच्या ९ गुणामुळे एकूण स्कोर १५ झाला.
रश्मी कुमारी ३८ गुणांसह इतर सर्व महिला स्पर्धकांमध्ये खूप पुढे राहिली. गुरूवारच्या स्पर्धेत एकूण  १६ स्लॅम, (१ अल्टिमेट,१ व
व्हाईट व १४ ब्लॅक स्लॅम) झाले.

आजच्या स्पर्धेत पी. अपूर्वा व प्रशांत मोरे या विश्वविजेत्याना  पिछाडीवर राहावे लागले हीच कॅरमची खरी अतीतटी  ठरली. पंचवीस हजारावर कॅरम शौकिनांनी या स्पर्धेत थरारा ऑनलाइन अनुभवला आणि ३० जून पर्यंत या ऑनलाइन स्पर्धेचा आनंद सर्वांना घेता येईल. ‌या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे संरक्षक आमदार गिरीश व्यास व विदर्भ कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष पूर्व मंत्री  खान मोहम्मद अजहर हुसैन यांनी केले आहे .
..........

टिप्पण्या