Save Farmers:भाजपा से किसान बचाओ' वंचित बहुजन आघाडीचे अभियान! 'Save the farmers from BJP' campaign of Vanchit Bahujan Aghadi!

'भाजपा से किसान बचाओ' वंचित बहुजन आघाडीचे अभियान!

अकोला: शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी व कर्जवाटप महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी, या मागणीसाठी आणि भाजपावाल्यांच्या नाटकी आंदोलनास शेतकऱ्यांनी बळी पडू नये, यासाठी सोमवारी वंचित बहूजन आघाडी अकोला जिल्ह्याचे वतीने शेताच्या बांधावर कर्जमुक्ती आंदोलन व "भाजपा से किसान बचाव" अभियान राबविण्यात आले. 

मागील दोन वर्षात ज्या शेतकरी लोकांनी पीक कर्ज गठन केले. परंतु त्या शेतकऱ्यांना शासनाने पीक कर्ज माफी मध्ये बसविले नाही. त्यांना तात्काळ कर्ज माफीत पात्र ठरविण्यात यावे.दोन लाखाच्या वर ज्या शेतकरी वर्गावर कर्ज आहे, त्यांना सुध्दा कर्ज माफी मिळाली पाहिजे.ज्या शेतकरी बांधवांना कर्ज माफी झाली पन त्यांच्या खात्यात अद्याप पर्यंत शासनाने पैसे जमा केले नाहीत म्हणून ते शेतकरी पीक कर्जा पासून अजून पर्यंत वंचित आहेत त्यांना सुध्दा त्वरीत लाभ व्हावा. 


राज्यात कोरोनाचे संकट आहे.परंतु त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी शेतमजूर ह्यांना बसत आहे.केंद्र सरकारची थेट आर्थिक मदत ही बनवाबनवी होती. तशीच राज्य सरकारच्या कर्जमाफी व पिक कर्ज तसेच ‘बांधावर खत आणि बियाणे’ या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. पीककर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे वंचित बहूजन आघाडी अकोला जिल्हाचे वतीने आज अभिनव आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी. पण शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावी व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी भाजपाची मागणी करीत आहे. परंतु त्यांच्या सरकारच्या काळात हे शहाणपण त्यांनी का दाखविले नाही, असा सवाल वंचित ने विचारला आहे. शेतकऱ्यांच्या सह्या गोळा करून त्यांचे निवेदन भाजपा राज्य सरकारला सादर करणार आहे.हा निव्वळ स्टंट असुन शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला केंद्रातील भाजप व राज्यातील आघाडी सरकार सारखेच जबाबदार आहे.  शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था झाली त्याला भाजपा, सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी सारखेच दोषी आहेत. म्हणून वंचितने संपुर्ण कर्जमाफी व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, मागील दोन वर्षात ज्या शेतकरी लोकांनी पीक कर्ज गठन केले. परंतु त्या शेतकऱ्यांना शासनाने पीक कर्ज माफी मध्ये बसविले नाही. त्यांना तात्काळ कर्ज माफीत पात्र ठरविण्यात यावे.दोन लाखाच्या वर ज्या शेतकरी वर्गावर कर्ज आहे, त्यांना सुध्दा कर्ज माफी मिळाली पाहिजे.ज्या शेतकरी बांधवांना कर्ज माफी झाली. पण त्यांच्या खात्यात अद्याप पर्यंत शासनाने पैसे जमा केले नाहीत म्हणून ते शेतकरी पीक कर्जा पासून अजून पर्यंत वंचित आहेत त्यांना सुध्दा त्वरीत लाभ व्हावा ,ह्या मागणी साठी राज्यातील सेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले.तसेच शेतकरी विरोधी भाजपाचे आंदोलन नाटकी असून त्यास शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन वंचितचे राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे यांनी केले.

यावेळी जिल्हा सचिव सुरेंद्र तेलगोटे, मोहन तायडे, रौउफ शहा, साबीर शहा, रामभाऊ तायडे,अर्जुन शिरसाट,विश्वास तरोडे, प्रविण मोरे, जयराम शिरसाट, महेन्द्र तेलगोटे, प्रवीण शिरसाट,जयराम शिरसाट,रमेश गोपनारायण, अक्षय शिरसाट,शिलवन गोपनारायण, सुरेश पांडे, शरद शिरसाट, रामराव भारताला, वैभव शिरसाट,अक्षय भोजन, समाधान गोपनारायण, सुरेश गोरले,संदिप शिरसाट, कैलास पांडे शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते, असे वंचित बहूजन आघाडी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे यांनी सांगितले.
................

टिप्पण्या