- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पर्यावरण संरक्षणासाठी गायक विराग मधुमालती आणि १६ गायकांच्या चमूचा अनोखा प्रयत्न
अकोला: कोरोनाच्या या लॉकडॉउन काळामध्ये आपणा सर्वांना आपल्या अंतर्मनात डोकावण्याची संधी मिळाली.
काही अपवादात्मक व्यक्ती सोडलेत तर इतरांनी आपल्या धरती मातेची काहीही काळजी केलेली नाही, परिणामी निसर्ग अती वेगाने विनाशाकडे जात आहे. या लॉकडाउ न काळामध्ये आपल्याला निसर्गात बराच सकारात्मक बदल बघावयास मिळाला व सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. अश्यावेळी या परिस्थितीचा लाभ घेत गायक वीराग मधुमालती, ज्यांनी संगीत क्षेत्रात विविध सामाजिक जनजागृती साठी आजवर ५वेळा जागतिक विश्वविक्रम भारताच्या नावे नोंदविले आहेत, यांनी एका आगळ्या वेगळ्या संकल्पनेची सुरुवात केली. त्यांनी स्वतः गेल्या वर्षापासून प्लास्टिक डिस्पोजेबल बॉटल मध्ये आजन्म पाणी न पिण्याचा व इतर काही संकल्प केले आहेत. आता संपूर्ण विश्वातील १६ गायक कलाकारांना एकत्रित करून
धरती मातेच्या रक्षणासाठी *मिशन सेव्ह मदर अर्थ* चा प्रचार व प्रसार करण्यासाठी संपूर्ण विश्वातील१६ गायकांना सोबत घेऊन २८ जुनला टयूब वर सलग १२तास गीत गायन करून इतरांना देखील पर्यावरण संवक्षणासाठी संकल्प घेण्यास प्रोत्साहित करणार आहेत.
या कार्यक्रमात चंद्रकांत पोपट, राहुल सोनावने, रेणु कोठारी, अविनाश सावंत, गिरीश पांडे, योगेश पनपलिया, कौशिक शाह, चांद माथुर, कला पाटिल, डॉ. सुधीर बंशेलकिकर, संजीव पडावे, नंदिनी नायडू, हेमंत देसाई, समर्थ डेरडेकर, दीपक श्रीवास्तव या गायक कलाकारांनी देखील पर्यावरण रक्षणासाठी वेगवेगळे संकल्प केले असून आपले अमूल्य योगदान दिले आहे.
सर्व गायक कलाकारांचे आभार व्यक्त करीत वीराग मधुमालती यांनी जास्तीत जास्त लोकांनी स्वेच्छेने निसर्गासाठी व आपल्या भावी पिढी साठी आजन्म काहीतरी संकल्प करावा असे आवाहन केले आहे.
.............
विश्व के पर्यावरण रक्षा का संदेश देने हेतु गायक विराग मधुमालती एवं १६ गायक कलाकारों दवारा अनोखा प्रयत्न
हम सभी ने, कुछ अपवाद छोड़कर, अपनी मनमानी करते हुए अपने धरती माता की बिल्कुल चिंता नहीं की, और लगातार पर्यावरण की हानी हो रही है। इस लॉकडाउन के दौरान हमने निसर्ग में कुछ बहोत ही अच्छे परिवर्तन होते हुए भी देखे है। तो इस आत्मचिंतन का लाभ लेकर गायक विराग मधुमालती, जिन्होंने विविध सामाजिक संदेश देने हेतु आजतक ५ जागतिक विश्वविक्रम हमारे भारत देश के नाम लिए है, ने एक अनोखी पहल की है।
उन्होंने खुद बीते १साल से डिस्पोजेबल प्लास्टिक बॉटल से पानी न पीने का प्रण लिया है।और अब विश्वभर के १६ गायक कलाकारों को लेकर पर्यावरण रक्षा के प्रचार हेतु *मिशन सेव्ह मदर अर्थ* के लिए २८ जून को लगातार १२ घंटे लाइव गाने का कार्यक्रम यू ट्यूब पर आयोजित किया है।
इसमें राहुल सोनावने, रेणु कोठारी, चंद्रकांत पोपट, गिरीश पांडे, योगेश पनपालिया, अविनाश सावंत, चांद माथुर, कला पाटिल, नंदिनी नायडू, संजीव पड़ावे, समर्थ डेर्डिकर, हेमंत देसाई, डॉ. सुधीर बंशेलकिकर,मेघमाला पांडकर, दीपक श्रीवास्तव इन १६ गायक कलाकारों ने अपना योगदान दिया है। इन कलाकारों ने स्वयं पर्यावरण रक्षा के लिए शपथ ली है और आैरो को भी इस गीत गायन कार्यक्रम के माध्यम से प्रोत्साहित कर रहे है।
इन सभी गायक कलाकारों हार्दिक शुभेच्छा एवं धन्यवाद देते हुए विराग मधुमालती ने सभी लोगो को अपनी धरती माता के संरक्षण हेतु स्वेच्छा से कुछ संकल्प लेने का आवाहन किया है।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा