National sport:राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्ती; अकोल्यातील २० खेळाडु पात्र

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्ती;

अकोल्यातील २० खेळाडु पात्र

अकोला: भारतीय शालेय खेळ महासंघ, भोपाळ यांचे वतीने सन  २०१९-२० या  शैक्षणिक वर्षामध्ये, क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विवीध खेळांच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या व प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील २० खेळाडू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्तीसाठी  पात्र ठरले आहेत. 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्ती रक्कमचे वाटप थेट पात्र खेळाडूंच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूस रू. 11250/- व्दितीय क्रमांक प्राप्त रू.8950  व तृत्तीय क्रमांक प्राप्त रु.6750/-  व  सहभागी खेळाडूस रू. 3750/- एवढी शिष्यवृत्ती देण्यात येते.

अकोला जिल्ह्यातील पात्र खेळाडूंची नावे    

बॉक्सिंग- शास्वत तिवारी, शेख रेहान शेख उस्मान, नाना धोंडिबा पिसाळ, सोहेल रमजान पप्पुवाले, राज श्याम तायडे, मो. नदिम मो. अदनान, विधी राकेश रावल, तनिश संजय बुंदेले, चेतन चंदन अंभोरे, तन्मय कळंत्रे.

बेसबॉल- मनिष विजय म्हैसने, आनंद भारत निकोसे, मैथली श्रीकांत सरोदे.

धनुर्विद्या-सुरज किशोर खानझोडे 

थ्रो बॉल- पवन अनिल जाधव.

सॉफ्टबॉल-परिमल धनराज धर्मे, नेहा भारत अंभोरे, विशाखा रतन हिरोडे.

कबड्डी-नक्षत्रा गजानन इंगळे.

हॅण्डबॉल- आदित्य उपेंद्र खन्नाडे.

पात्र ठरलेल्या या खेळाडूंनी आपले सहभाग/ प्रावीण्य प्राप्त केलेल्या सन २०१९-२० चे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत, खेळाडुच्या बँक खात्याच्या पासबुकची  झेरॉक्स व आधार कार्डचे झेरॉक्स सोमवार १५ जून पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करावी, त्यानंतर  त्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येईल,  अशी माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी  गणेश कुळकर्णी यांनी दिली.

.........

टिप्पण्या