Lonar lack:निसर्गाचा चमत्कार; लोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी! Miracles of nature; The water of Lonar lake turned pink!

निसर्गाचा चमत्कार; लोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी!

बुलडाणा,दि.१०:  जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी बुधवार,१० जून रोजी अचानक गुलाबी झाल्याचे स्थनिक नागरिकांच्या निदर्शनात आले. यामुळे निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी लोणार मधील हजारो नागरिकांनी सरोवर ठिकाणी गर्दी केली. सरोवराचे मनमोहक  गुलाबी रुप पाहून अनेकांच्या डोळ्यांची पारणे फिटली;तर काहींनी आश्चर्य व्यक्त केले. एरव्ही हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी आज अचानक गुलाबी झाल्याने याबाबत अनेकांच्या मनात कुतुहुलसुद्धा निर्माण झाले. 

दरम्यान, तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली. पाण्याने रंग कशामुळे बदलला, याचे संशोधन सुरू आहे. आधी कोरोना, मग टोळधाड, नंतर चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांच्या मालिकेत सरोवराचे गुलाबी पाणी आणखी कुठल्या संकटाचे संकेत देत आहे का ? या दिशेनेही काही जिज्ञासूंनी विचार करायला सुरुवात केली आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे,हे येथे उल्लेखनीय आहे.

बेसॉल्ट खडकापासून बनलेले एकमेव सरोवर

लोणार हे जागतिक दर्जाचे बेसॉल्ट खडकापासून बनलेले एकमेव सरोवर आहे. या खाऱ्या पाण्याच्या सरोवर परिसरात असलेल्या मातीमध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत. चंद्रावरील मातीचे खाऱ्या पाण्याच्या गुणधर्माशी जवळचे नाते आहे, असे जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. या सरोवराचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे संशोधक नेहमी येतात. मात्र, कोरोना विषाणूमुळे गेले तीन महिन्यांपासून लाॅकडाउनमुळे सरोवर परिसरात कोणीही अभ्यासक आले नाहीत.पाण्याचा रंग गुलाबी कसा झाला,रंग बदलण्याचे कारण काय,यावर आता संशोधन होणे गरजेचे आहे.मात्र,प्रशासन यावर किती गंभीर्यने पाहते, यावर अवलंबून आहे.तर पाण्यात रासायनिक द्रव्य तर मिश्रित झाले नाही ना, अशी श्यक्यता काही नागरिकांनी वर्तविली. 


Miracles of nature; The water of Lonar lake turned pink:व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा।

......................................................


Miracles of nature;  The water of Lonar lake turned pink!

Buldana, Dec 10: Locals observed that the water of the world famous Lonar Lake suddenly turned pink on Wednesday, June 10.  As a result, thousands of people from Lonar flocked to the lake to witness this miracle of nature.  Many were shocked to see the beautiful pink appearance of the lake, while some expressed surprise.  Many people are curious about the sudden turn of the lake, which looks like a green and blue lake.

Meanwhile, Tehsildar Saidan Nadaf visited the lake and inspected it.  Research is underway into what caused the water to change color.  In a series of natural disasters, first corona, then locusts, then hurricanes, earthquakes, does the pink water of the lake indicate any other crisis?  Some curious people have started thinking in this direction too.  Lake Lonar, created by meteorites, is the second largest saltwater lake in the world.

.........



टिप्पण्या