International Yoga day:आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार घरोघरी छतावर!

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार घरोघरी छतावर!

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नाविण्यपुर्ण आयोजन


अकोला: संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केलेला आहे. ५ हजार वर्षे पुुर्वीची परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि  मानसिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. त्याअनुषंगाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिनाचे म्हणून साजरा करण्यात येतो.

सद्यस्थितीत जगभर कोवीड 19 हा साथरोग पसरला असल्यामुळे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन एकत्रित आयोजित न करता जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला शहरातील योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था, यांच्या द्वारा नाविण्यपुर्ण योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.


२१ जून  रोजी सकाळी ६.३० वाजता योग दिनी शहरातील उंच इमारतीच्या छतावर तज्ञ योग साधक त्यांचे साधकासह उपस्थित राहुन योगाचे प्रात्याक्षिके करतील व ध्वनीक्षेपनाद्वारे माहिती देतील. त्यानुसार त्या परिसरातील इमारतीच्या टेरेस,  गॅलरी व परीसरामध्ये प्रत्येक नागरीकाने तज्ञ योग साधकाच्या दिशा निर्देशानुसार व आयुष मंत्रालयाच्या https://youtu.be/zllkkMDBfdM या लिंक मध्ये दिलेल्या प्रोटोकॉलनुसार वैयक्तिक स्वरुपात  शासनाने व प्रशासनाने कोवीड 19 या साथरोगा बाबत घ्यावयाच्या खबरदारी बाबत दिलेल्या सुचनांचे योग्य पालन करुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे सर्वाच्या सहकार्याने साजरा करावयाचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि, शहरातील ज्या भागात वरील  योग प्रात्याक्षिके  व ध्वनीक्षेपकाची सुविधा उपलब्ध राहणार नाही, अशा भागात नागरीकांनी आपल्या इमारतीचे टेरेसरवर, घरात मोकळया जागेत योगसाधना करुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा.


निवड केलेल्या इमारती व प्रशिक्षक, संस्थेचे नावे 

महावैष्णवी रेसीडेंसी क्रमांक ६, जवाहरनगर चौक,

 अरविंद जोग, विश्वास योग व निसर्गपोचार केंद्र

राजरत्न रेसीडेंसी डॉ फडके हॉस्पीटल जवळ, जवारनगर चौक

 माया भुईभार, अजिंक्य योग वर्ग रामदासपेठ, अकोला

यत्नशिल अपार्टमेंट न्यु भागवत प्लॉट,

 मनिषा गिरीश नाईक, चैतन्य योग फाउंडेशन

गिता भवन, शिवाजी पार्क समोर

 संदीप बाहेती अकोला

सिध्देश्वर गणराया अपार्टमेंट, सिध्दीविनायक मंदीरासमोर

 शुभांगी वझे व डॉ. गजानन वाघोडे, बालशिवाजी योग वर्ग

कुसुवंत अपार्टमेंट, मोहिते प्लॉट, मारोती मंदीराजवळ

प्रशांत उंबरकर गुरुजी

मुरलीधर टॉवर, बाराजोर्तिलिंग मंदीराजवळ

 श्वेता बेलसरे

राजेंद्र रेसीडेंसी, गजाननपेठ, उमरी, अकोला

 निता शरद भागवत, (युथ हॉस्टेल ऑफ इंडिया अकोला युनिट)

जुने छाया मंगल कार्यालय, एलआयसी ऑफीस, अकोला

स्फुती योगा, सौरभ भालेराव,

१०

हिम्मतलाल ब्रदर्स इमारत, जुना शितला माता मंदीरा जवळ

 प्रशांत वाहुरवाघ,  अविनाश वतसकर अजिंक्य फिटनेस पार्क, अकोला

११

 

 सुहास काटे, पंताजली योग समिती

१२

फडकेनगर हनुमान मंदीराचे मागे

पुरुषोत्तम आवळे, पंताजली योग समिती

 याप्रमाणे शहरातील विविध भागात नाविण्यपुर्ण योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक भागात नाविण्यपुर्ण योग दिन साजरा होण्यासाठी इमारती तसेच  प्रशिक्षक, संस्थांची तयारी असल्यास अशा योग प्रशिक्षकांनी अधिक माहितीसाठी धनंजय भगत, अजिंक्य फिटनेस पार्क, केडीया प्लॉट, उमरी रोड, अकोला अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे संपर्क साधावा, अशी माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली.  

....................

टिप्पण्या