उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात वकिलांची यादी प्रस्तावित;अकोल्याचे संजय मेहरे यांचा यादीत समावेश
अकोल्याचे संजय मेहरे यांचा यादीत समावेश
अकोला: मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाला वकिलांची २२ नावे असलेली यादी प्रस्तावित केली असून, यामध्ये    अकोल्याचे संजय मेहरे (बाळासाहेब मेहरे) यांच्या नावाचा समावेश आहे. या २२ वकिलांची उच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याची शिफारस केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात १ जून २०२० रोजी रिक्त झालेल्या जागांची संख्या ९४ आहे.शिफारस केलेल्या २२ नावांमध्ये अशा वकिलांचा समावेश आहे, जे मुंबई उच्च न्यायालयासमोर वकिलीचा सराव करीत आहेत.
उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून एखाद्या व्यक्तीची नेमणूक करण्याचे निकष घटनेच्या अनुच्छेद २१७ अंतर्गत प्रदान केले आहेत.  
असे आहेत निकष
*किमान दहा वर्षे भारताच्या हद्दीत न्यायिक कार्यालय ठेवले आहे;  किंवा
*कमीतकमी दहा वर्षे उच्च न्यायालयाचा किंवा अशा प्रकारे दोन किंवा त्याहून अधिक न्यायालयात वकीलीचा अनुभव आहे.
शिफारस केलेल्या वकीलांच्या नावांची यादी 
 अरुणा शांताराम पै
 एस. जी. डायजे
 जी. ए. सानप
 संजय मेहरे
 आर. एन. लढ्ढा
 संजीव प्रताप कदम
  संदीप मारणे
 शर्मिला उत्तमराव देशमुख
 सचिंद्र भास्कर शेट्ये
 कमल रश्मी खाटे
 अमीरा अब्दुल रझाक
 संतोष गोविंदराव चपळगावकर
 अनिकेत विनय देशमुख
 महाजन सुरेखा पंडितराव
 शैलेश परमोद ब्रह्मे
 संदीप हरेंद्र पारिख
 सोमशेखर सुंदरेसन
 मकरंद मनोहर अग्निहोत्री
 अभय रामदास सांबरे
 रणजित दामोदर भुईभार
 गौरी सुंदरसेंन वेंकटरमन
 महेंद्र माधवराव नेरळीकर
ही नावे सुप्रीम कोर्टाच्या नियुक्त निवड समिती समोर ठेवली जातील. ज्यात, सुप्रीम कोर्टाच्या तीन ज्येष्ठ सर्वाधिक न्यायाधीशांचा समावेश असेल. आणि ते नंतर प्रत्येक उमेदवारावरील इंटेलिजेंस ब्युरोच्या अहवालासह वकिलांच्या नावांवर जाणीवपूर्वक विचार करतील.
सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेनंतर प्रस्तावित उमेदवारांची नावे कायदा व न्याय मंत्रालयाकडे पाठविली जातील, जे नावे भारताच्या राष्ट्रपतींना पाठवतील.राष्ट्रपती त्यांच्या स्वाक्षरी व शिक्कामोर्तब करून नियुक्तीचे आदेशपत्र जारी करतील व त्यानंतर शासकीय अधिकृत राजपत्रात त्यास सूचित केले जाईल. ज्याद्वारे प्रस्तावित उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेण्यास पात्र असतील.
.........
 
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा