Health:कर्तव्यावर अनधिकृतपणे गैरहजर राहणे आरोग्य कर्मचाऱ्यांना भोवले;सीईओनी केली कारवाई

कर्तव्यावर अनधिकृतपणे गैरहजर राहणे आरोग्य कर्मचाऱ्यांना भोवले;सीईओनी केली कारवाई

आमदार अमोल मिटकरी यांच्या अकस्मित भेटी दरम्यान प्रकार उघड


अकोला : विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी ८ जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड -१ येथे आकस्मिक भेट दिली असता, आरोग्यसेवक धीरज निमकर्डे व परिचर श्रीमती डि.आर.नागे हे त्यांचे कर्तव्यावर कुठलीही सूचना न देता अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे आढळून आले होते. यावर जिल्हा परिषद मुख्यकार्यधिकारी यांनी कारवाई करून, २२जून रोजी कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत.

"कोरोनाच्या संकट काळामध्ये आरोग्य विभागासह सर्व विभाग देवदूत म्हणून कार्य करीत असतांना, अशा काळामध्ये कुठलीही सूचना न देता अधिकारी गैरहजर राहत असतील तर ही नक्कीच गंभीर बाब आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे हे महत्त्वाचे आहे."
                                  अमोल मिटकरी
                                       आमदार

सद्या संपूर्ण जिल्हयात कोरोना विषाणू साथीचा प्रादुर्भाव झालेला असुन आरोग्य कर्मचा-यांनी त्यांचे मुख्यालयी चोविस तास हजर राहणे आवश्यक असताना आरोग्यसेवक व परिचर यांनी वरिष्ठांची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता मुख्यालयी गैरहजर असल्याचे आढळून आले आहे.त्यांनी त्यांचे कर्तव्यामध्ये कसुर केल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा वर्तणुका नियम १९६७ मधील नियम ०३ चे उल्लंघन केल्यामुळे धीरज निमकर्डे व श्रीमती डि.आर नागे यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ मधील भाग तीन ४ (दोन) नुसार एक वार्षिक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम न होता रोखण्याचा आदेश २२ जून रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढला आहे.

यापुढे त्यांचे वर्तणुकीत आवश्यक सुधारणा न केल्यास त्यांचे विरुध्द नियमानुसार प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल व सदर आदेशाची नोंद सबंधीताचे मुळ सेवापुस्तकामध्ये घेण्यात यावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केले आहे.
.........







 

टिप्पण्या