Farmer: शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे सीसीआयने लवकर करावे

शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे सीसीआयने लवकर करावे

शेतकरी संघटना  महिला आघाडीची मागणी

अकोला: अकोट केंद्रावर कपासाची खरेदी सुरू आहे.खुल्या बाजारात कापसाचे दर कमी असल्याने शेतकरी सी सी आय च्या खरेदीत कापूस देत आहेत.चार जून पासून शेतकऱ्याचे पैसे मिळालेले नाही.त्या पूर्वीचे काही शेतकऱ्यांचे कापसाचे पैसे बाकी आहेत. सध्या पेरणी चा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज भासत आहे. कापसाचे पैसे मिळण्यास उशीर लागत आहे. व काही शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक अडचणी मुळे अडकलेले आहेत याच्या तक्रारी शेतकरी संघटना अकोट तालुका महिला आघाडी प्रमिला भारसाकळे यांच्या कडे येत होत्या. याला अनुसरून महिला आघाडी ने अकोट केंद्राचे प्रभारी असलेले बेरावा यांचे कार्यालय गाठले. शेतकऱ्यांचे कापसाचे लवकर द्यावे.काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणी मुळे जे कापसाचे पैसे बाकी आहेत.ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे,अशी मागणी अकोट तालुका शेतकरी संघटना  महिला आघाडी  प्रमिला भारसाकळे यांनी सी सी आय अकोट केंद्राचे प्रभारी बेरावा यांच्याकडे केली.

सीसीआयच्या कार्यालयात महिला शेतकऱ्यांना येण्याची वेळ येऊ नये, याची दक्षता कर्मचाऱ्यांनी घ्यावी. यावर संवाद झाला. त्याला प्रतिसाद देत अकोला येथील सीसीआयचे कर्माचारी कामाला लागल्याचे बेरवा यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंजुषा दिनेश गिर्हे, मुक्ता भारसाकळे,  प्रिया दिनेश देऊळकार,किरण कौठकर, रेणुका भारसाकळे आदी उपस्थित होत्या.

टिप्पण्या