Fake Account: वंचित बहुजन आघाडीच्या नावे सोशल मीडियावर ' फेक अकाउंट'!

वंचित बहुजन आघाडीच्या नावे सोशल मीडियावर ' फेक अकाउंट'!

पक्षाला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र-प्रकाश आंबेडकर यांचा आरोप


फेक आयडीवर कारवाई करण्याचा निर्णय


अकोला: वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या नावाने सोशल मीडियावर पक्षाच्या अधिकृत पेजेस व्यतिरिक्त अनेक ग्रुप, पेजेस आणि प्रोफाईल्स कार्यरत आहेत. यातील काही अकाऊंट पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बनवलेले आहेत, तर काही अकाऊंट पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी बनवलेले असल्याचे लक्षात आले आहे. फेक अकाउंटच्या माध्यमातून चुकीच्या आणि द्वेषपूर्ण पोस्ट पसरवून वंचित बहुजन आघाडीची प्रतिमा मलिन करण्याचे हे षड्यंत्र आहे. त्यामुळे पक्षाने अशा फेक आयडीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी / कार्यकर्ते यांनी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब, टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या नावाने तयार केलेले सर्व ग्रुप, पेजेस, प्रोफाईल्स, चॅनेल्स पक्षाने ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. असे सर्व ग्रुप, पेज, प्रोफाइल, चॅनेलचा एक्सेस 
पक्षाचा पुढील कार्यकर्त्यांकडे संबंधित व्यक्तीने दोन दिवसाच्या आत सुपूर्द करायचा आहे. आणि यानंतर 'वंचित बहुजन आघाडी' या नावाने कोणीही परस्पर सोशल मीडियावर अकाऊंट चालवू नये. कार्यकर्त्यांनी बनवलेल्या अकाऊंटचा ताबा मिळाल्यानंतर उर्वरित फेक अकाउंटच्या विरोधात कारवाई केली जाईल. 

वंचित बहुजन आघाडीची अधिकृत भूमिका ही बाळासाहेब आंबेडकर यांचे व्हेरिफाईड फेसबुक पेज (ब्लू टिक असलेले) आणि व्हेरिफाईड ट्विटर अकाउंट तसेच वंचित बहुजन आघाडीचे व्हेरिफाईड फेसबुक पेज (ब्लू टिक असलेले) आणि व्हेरिफाईड ट्विटर अकाउंट आणि प्रबुद्ध भारतचे व्हेरिफाईड फेसबुक पेज आणि ट्विटर अकाउंट याद्वारे प्रसारित केली जाते. त्यामुळे सर्वांनी हे अधिकृत अकाऊंट फॉलो करावे आणि यावर प्रसारित झालेली भूमिकाच पक्षाची अधिकृत भूमिका समजण्यात यावी. 

एक्सेस देण्यासाठी संपर्क क्रमांक

1. जितरत्न पटाईत - 7385550633
2. साक्य नितीन - 8108133736
3. वीर भागवत - 8850048068
4. राजेंद्र पातोडे - 9422160101
5. सिद्धार्थ मोकळे - 8007009364 यांच्याशी अधिक माहितीसाठी कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा.
....................








टिप्पण्या