Devendra fadanvis:कोविडच्या काळात राज्यातील कोणत्याही महापालिकेला राज्य सरकारने आर्थिक मदत केली नाही-देवेंद्र फडणवीस

कोविडच्या काळात राज्यातील कोणत्याही महापालिकेला राज्य सरकारने आर्थिक मदत केली नाही-देवेंद्र फडणवीस 


*वैधानिक विकास महामंडळाची मुदत वाढ करावी

*राज्य सरकार माध्यमांची मुस्कटदाबी करत आहे 

*सर्वच पक्षांनी राजकीय संस्कृती जपण्याची गरज आहे


अकोला: राज्यात कोरोना बधितांची वाढती संख्येमुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अधिक बाधित जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी अकोल्यातील डॉ पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठ आणि अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली.यावेळी त्यांनी येथील व्यवस्थेवर समाधान मानले. मात्र, राज्य सरकारने कोविडच्या काळात एकाही महापालिका नगरपालिकेला मदत केली नसल्याचं आरोप त्यांनी केला. 


यावेळी त्यांनी वैधानिक विकास महामंडळाची मुदत वाढ करण्याची मागणी सुद्धा केली.तर गेल्या तीन महिन्यात राज्य सरकार माध्यमांची मुस्कटदाबी करत असल्याचंही त्यांनी म्हंटले. सर्वच पक्षांनी राजकीय संस्कृती जपण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हंटले. 

काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसवर टीका करताना त्यांनी काँग्रेसच्या राजीव गांधी फाउंडेशनला चीनने कोणत्या उद्देशाने मदत केली हे काँग्रेसने स्पष्ट करण्याची मागणी केली.
दरम्यान, खंडेलवाल भवन येथे सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमासमोर कोविड19 मुळे राज्यात उदभवलेल्या परिस्थितीला आघाडी सरकार जबाबदार असल्याचे म्हंटले.
.........

टिप्पण्या