- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Record break
अकोल्यात कोरोनाचा कहर;एकाच दिवशी ९० पॉझिटिव्ह!५० कैद्यांचा समावेश
आतापर्यंत एकूण १५१०कोरोनाग्रस्त
अकोला: राज्यात मुंबई,पुणे, औरंगाबाद नंतर विदर्भातील अकोल्यात कोरोना विषाणूने कहरच केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवार २८ जून रोजी आतापर्यंत आढलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याची नोंद मोडीत काढत, सर्वधिक ९० पॉझिटिव्ह रुग्ण एकाच दिवशी आढल्याची नोंद झाली. यामध्ये ५० कैद्यांचा समावेश आहे.
रविवारी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ३४५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २५५ अहवाल निगेटीव्ह तर ९० अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १५१० झाली आहे. आज उपचार घेतांना तीन जणांना मृत्यू झाला. तर दिवसभरात २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर अखेर ३५८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १०३८३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १००२३, फेरतपासणीचे १४४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २१६ नमुने होते. आजपर्यंत एकूण १०३३३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८८२३ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १५१० आहेत.
९० पॉझिटिव्ह
रविवारी दिवसभरात ९० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.सकाळी ७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. यापैकी पातूर येथील सात , बाळापूर येथील सात ,टेकडीपुरा ता. अकोट (पोपटखेड ता.अकोट ग्रामिण रुग्णालयातून संदर्भित) सहा ,राजदे प्लॉट येथील दोन तर उर्वरित अकोट, बार्शीटाकळी, देवी खदान, अशोक नगर, जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी १२ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व सहा पुरुष आहेत. सात तारफैल येथील तर चार लहान उमरी येथील व खदान येथील एक जण रहिवासी आहेत.
तीन मयत
दरम्यान,रविवारी तीन जण मृत्यू झालेे. त्यातील एक अशोकनगर येथील ६२ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण दि.२६ रोजी दाखल झाला व त्याच दिवशी मयत झाला. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. तर अन्य मयत हा बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि.१४ रोजी दाखल झाला होता त्याचा दि.२७ रात्री मृत्यू झाला. दरम्यान दुपारनंतर एका जणाचा मृत्यू झाला असून हा व्यक्ती बार्शीटाकळी येथील ५३ वर्षीय पुरुष होता. हा रुग्ण दि.१६ रोजी दाखल झाला होता त्याचा रविवारी मृत्यू झाला.
२८ जणांना डिस्चार्ज
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच तर कोविड केअर सेंटर मधून २३ अशा २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ज्या रुग्णांना रविवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना घरी सोडण्यात आले. ते रुग्ण सिंधी कॅम्प, खैर मोहम्मद प्लॉट, महाकाली नगर, अकोट फैल व शंकरनगर येथील रहिवासी आहेत. तर कोविड केअर सेंटर मधून ज्या २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सिंधी कॅंप मधील सहा जण, खदान, अशोक नगर व अकोट फैल येथील प्रत्येकी तीन जण व देशमुख फैल, शिवनी, शिवाजीनगर, लहुजी नगर, लाडिस फैल, हरिहर पेठ, शंकर नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
३५८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १५१० पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७७ जण (एक आत्महत्या व ७६ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०७५ आहे. तर सद्यस्थितीत ३५८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा